Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“मला आऊट व्हायचे नव्हते”, दमदार शतकानंतर ख्वाजाने सांगितला आपला गेमप्लॅन

March 9, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/Cricket Australia

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvAUS) संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्याला गुरुवारपासून ( 9 मार्च) सुरुवात झाली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दबदबा राखला. उस्मान ख्वाजा याने झळकावलेले नाबाद शतक ऑस्ट्रेलियन डावाचे वैशिष्ट्य ठरले. त्याचवेळी या खेळीनंतर बोलताना त्याने आपली प्रतिक्रिया दिली.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम फलंदाज दिसलेल्या ख्वाजाने अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा धीराने सामना केला. ट्रेविस हेडसह अर्धशतकी सलामी दिल्यानंतर इतर फलंदाज बाद होत असताना त्याने कमालीचा संयम दाखवला. सलामीला फलंदाजीला उतरल्यानंतर दिवसातील अखेरच्या षटकात त्याने आपले शतक पूर्ण केले. हे त्याच्या कसोटी कारकीर्दीतील 14 वे तर, भारताविरुद्धचे पहिले कसोटी शतक ठरले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा तो 251 चेंडूवर 104 धावा काढून नाबाद आहे. त्याने या खेळी दरम्यान 15 चौकार मारले.

पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर तो पत्रकारांना सामोरा गेला. त्यावेळी बोलताना तो म्हणाला,

“हे शतक माझ्यासाठी अत्यंत भावनिक आहे. कारण हे शतक झळकावणे ही जवळपास एक यात्रा होती. एक ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हणून तुम्ही ही कामगिरी करण्यास इच्छुक असता.”

तो पुढे म्हणाला,

“फलंदाजीला अनुरूप असलेल्या या खेळपट्टीवर बाद न होणे ही एक भावनिक लढाई होती. तुम्हाला मोठ्या काळासाठी अशा खेळपट्टीवर टिकून राहणे आवश्यक असते.”

ऑस्ट्रेलियन संघाने या सामन्यात पहिल्या दिवशी शानदार खेळ दाखवला. ख्वाजाच्या शतकाव्यतिरिक्त कर्णधार स्टीव्ह स्मिथने 37 व 32 धावांचे योगदान दिले. तर, कॅमेरून ग्रीन 49 धावांवर नाबाद आहे. यासह ऑस्ट्रेलियाने दिवसाखेर 4 बाद 255 धावा उभारल्या. भारतासाठी शमीने दोन बळी मिळवले. ‌‌‌‌

(Usman Khwaja Said It’s Century With Mental Fight After Ahmedabad Test Day 1)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार म्हणून स्मिथ जेव्हाजेव्हा भारतात आला तेव्हा नडलाय, पाहा ही जबरदस्त आकडेवारी
‘टीम इंडियाला भासतेय पंतची उणीव’, केएस भरतच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे नेटकऱ्यांना आठवला रिषभ, Video


Next Post
Hamid Hassan

अफगाणिस्तानी दिग्गजाने घेतली निवृत्ती, मिळाली राष्ट्रीय संघाची सेवा करण्याची संधी

Usman Khawaja

मागच्या 10 वर्षीत एकट्या ख्वाजाने भारतात केली 'अशी' कामगिरी, केली श्रीलंकन दिग्गजाची बरोबरी

Photo Courtesy: Twitter

भारतीय क्रिकेटपटूंनी वाहिली अभिनेते सतिश कौशिक यांना श्रद्धांजली, ट्विट करत जागवल्या आठवणी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143