IPL मध्ये एकाच संघासाठी खेळणारे अनेक खेळाडू आहेत तर काही असे खेळाडू आहेत की जे अनेक संघांसाठी खेळले आहेत. मुंबई इंडियन्स संघासाठी 11 वर्षे सातत्याने खेळणाऱ्या कायरन पोलार्डने त्याच्या आयपीएल कारकीर्दीतल्या 3000 धावा पूर्ण केल्या आहेत.
कायरन पोलार्ड हा 2010 साला पासून मुंबईच्या संघाचा हिस्सा बनला आहे. मधल्या फळीत खेळताना एक ‘फिनिशर’ म्हणून त्याने चांगली कामगिरी बजावली. अनेक वेळा वाईट परिस्थितीतून त्याने संघाला सावरले आहे. पराभूत होण्याच्या दिशेने जात असलेले सामनेही त्याने संघाला एकहाती जिंकून दिले आहे. पोलार्डने मुंबईसाठी कर्णधार म्हणूनही जबाबदारी बजावली आहे.
मुंबईकडून खेळणाऱ्या कर्णधार रोहित शर्मापेक्षाही जुना खेळाडू म्हणून कायरन पोलार्डकडे पाहिले जाते. रोहितने 2008 ते २०११ या तीन वर्ष डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळले होते तर त्यानंतर 2011 पासून आजतागायत तो मुंबईचा महत्त्वाचा घटक बनला आहे.
कायरन पोलार्डचे आयपीएल मध्ये मुंबई साठीचे योगदान
मुंबईचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने आतापर्यंत 11 वर्षांत आयपीएलमध्ये एकूण 162 सामने खेळले आहेत. यात त्याने एकूण 3014 धावा केल्या आहेत. पोलार्डच्या 15 अर्धशतकी खेळींचाही यात समावेश आहे. पोलार्डने मधल्या फळीत धुव्वांधार फलंदाजी करताना एकूण 194 चौकार तर 198 षटकार ठोकले आहेत. पोलार्डला आयपीएलमध्ये २०० चौकार व २०० षटकार मारण्याचा विक्रम नावावर करण्याची संधी असून मुंबई यावर्षी प्ले ऑफमध्ये गेल्याने त्याला मोठी संधी आहे.
एक अष्टपैलू खेळाडू म्हणून पोलार्डने सुरुवातीची चार वर्षे मुंबईसाठी सातत्याने गोलंदाजी केली होती. त्याने पहिल्या चार वर्षांतच 51 बळी घेतले होते. यानंतर पुढील सात वर्षांत त्याने फारशी गोलंदाजी केली नाही. त्याला मिळालेल्या संधीत त्याने सात वर्षांत 8 बळी घेतले आहेत. 2015-2019 पर्यंत त्याने एकही बळी घेतला नव्हता.
परंतु पाच वर्षांच्या मोठ्या कालावधी नंतर पोलार्डने प्रथमच 2020 मध्ये आयपीएल बळी घेतला. या हंगामात त्याने 3 खेळाडूंना बाद केले आहे. संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत पोलार्डने 59 बळी घेतले आहेत. तर पोलार्डचे क्षेत्ररक्षण देखील तितकेच बहारदार व जबरदस्त मानले जाते. त्याने घेतलेले झेल मुंबईला सामन्यात पुढे ठेवतात. पोलार्डने आयपीएलमध्ये एकूण 90 झेल घेतले असून तो पुढील हंगामात 100 झेल घेण्याचा विक्रम करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितसाठी देश जास्त महत्त्वाचा का आयपीएल? माजी निवडकर्त्याच्या प्रश्नाने सोशल मीडियावर खळबळ
शतकांच्या ‘या’ मोठ्या विक्रमात पाकिस्तानी खेळाडूची हवा, विराट कोहलीवरही ठरला वरचढ
Eliminator: प्ले ऑफमध्ये पोहोचल्यानंतर हैदराबादच्या वॉर्नरचं कोहलीला ‘विराट’ चॅलेंज
ट्रेंडिंग लेख-
आर्थिक तंगीमुळे एकेवेळी प्लंबिंग व्हॅन चालणारा क्रिकेटर पुढे वेगाचा बादशाह झाला…
आयपीएल २०२०: प्रतिभा असूनही ‘हे’ पाच खेळाडू राहिले वंचित, नाही मिळाली संधी
मुंबईचे ३ धडाकेबाज खेळाडू, ज्यांना पुढील हंगामात केले पाहिजे रिलीझ