आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील सराव सामने देखील सुरू झाले आहेत. सोमवारी (१८ ऑक्टोबर) वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सराव सामना पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान कायरन पोलार्डनेच पाकिस्तानच्या गोलंदाजावर हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले आहे.
या सामन्यात कायरन पोलार्ड ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यावेळी बाबर आजमने शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी हारीस राऊफला दिली होती. या षटकात कायरन पोलार्डचे रौद्ररूप पाहायला मिळाले होते. त्याने हारीस रऊफच्या षटकात एका पाठोपाठ एक ५ चेंडूवर सलग ५ चौकार मारले. जे पाहून वेस्ट इंडिज संघाच्या ताफ्यात देखील जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु शेवटच्या चेंडूवर हारीस रऊफने जोरदार पुनरागमन करत कायरन पोलार्डला त्रिफळाचित केले.
हारीस राऊफने सुरुवातीच्या ३ षटकात चांगली गोलंदाजी केली होती. परंतु शेवटच्या षटकात त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. कायरन पोलार्डने या डावात १० चेंडूंमध्ये ५ चौकारांच्या साहाय्याने २३ धावा केल्या. त्याला जर शेवटच्या चेंडूवर आणखी एक चौकार मारण्यात यश आले असते,त र त्याच्या नावे एकाच षटकात ६ चौकार मारण्याच्या विक्रमाची नोंद झाली असती. यापूर्वी त्याने श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात एकाच षटकात ६ षटकार मारण्याचा पराक्रम केला होता.
Kieron Pollard 🔥🔥
.
.#cricket #T20WorldCup #westindies #Pakistan #KieronPollard pic.twitter.com/oaESg3zGKO— CRICKETNMORE (@cricketnmore) October 18, 2021
पाकिस्तान संघाचा ७ गडी राखून विजय
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, वेस्ट इंडिज संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शिमरोन हेटमायरने वेस्ट इंडिज संघाकडून सर्वाधिक २८ धावांची खेळी केली. तर कायरोन पोलार्डला २३ धावा करता आल्या. तसेच ख्रिस गेल अवघ्या २० धावा करत माघारी परतला. या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाला २० षटक अखेर ७ बाद १३० धावा करण्यात यश आले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तानने १६ व्या षटकातच त्यांचे लक्ष्य साध्य केले.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकातील गेलचा ‘हा’ विक्रम मोडणे अशक्य, विस्फोटक फलंदाज रोहित-ब्रावोलाही नाही जमणार