वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड हा काही-ना-काही कारणामुळे क्रिकेट मैदानामध्ये सतत चर्चेत असतो. मग ते एखाद्या खेळाडूशी वाद-विवाद असो किंवा खेळताना केलेली एखादी कृती असो. जी सामन्यानंतर एक चर्चेचा विषय ठरते. त्यामध्ये त्याने मंगळवार (20 एप्रिल) रोजी आयपीएल 2021 मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात शिखर धवन फलंदाजी करत असताना त्याला बाद करण्यासाठी अशीच काहीतरी कृती केली आहे, जी सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
या सामन्यात स्टीव स्मिथ आणि शिखर धवन फलंदाजी करत असताना १० व्या षटकात कायरन पोलार्ड गोलंदाजी करण्याकरिता आला. त्यावेळी फलंदाजी करत असलेला स्मिथ स्ट्राईकवर होता, तर धवन नॉन स्ट्राईकर बाजूला उभा होता. यावेळी पोलार्डने षटकातील दुसरा चेंडू टाकण्याअगोदरच धवन धाव घेण्यासाठी रेषेच्या पुढे गेल्याने पोलार्डने त्याला मांकडींग नुसार बाद करण्याचा इशारा दिला.
त्याने केलेल्या या कृतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून काही लोकांनी या खेळ भावनेवर प्रश्न उचलले आहेत. याअगोदरही आयपीएलमध्ये एकदा आर अश्विनने जोश बटलरला मांकडींगद्वारे बाद केले होते.
#MIvsDC pic.twitter.com/7k1MVPBEFU
— MumbaiCha Fan (@mumbaichafan) April 20, 2021
या सामन्याबद्दल सांगायचे झाले तर, मुंबई इंडियन्सऩे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 138 धावा केल्या होत्या. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा सोडता कोणात्याही खेळाडूला मोठी खेळी साकरता आली नाही आणि पुन्हा एकदा मुंबईची मधली फळी सपशेल अपयशी ठरली. रोहित शर्माच्या 44 धावांच्या खेळीमुळे मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 138 केल्या.
यामध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या अमित मिश्राने मुंबईच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून बाद केले. त्याने आपल्या चार षटकांत 24 धावा देऊन चार बळी घेतले. तसेच आवेश खान आणि ललित यादव यांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. यामध्ये आवेश खानने 15 धावा देऊन 2 तर ललित यादवने 17 धावा देऊन 1 बळी मिळवला.
मुंबई इंडियन्सने दिलेल्या 138 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघातील सलामीवीर शिखर धवन 45 आणि स्टीव्ह स्मिथ 33 यांच्या महत्वपूर्ण खेळीमुळे दिल्लीनेे 19.1 षटकांत चार गडी गमावून 138 धावा करत मुंबई इंडियन्सवर 6 गडी राखून विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
DCvMI: निर्णायक षटकात २ नो बॉल टाकत बुमराह ठरला खलनायक, नावे झाला लाजिरवाणा विक्रम
पराभवानंतर आणखी एक झटका; ‘या’ कारणामुळे मुंबईचा कर्णधार रोहितला तब्बल १२ लाखांचा दंड