---Advertisement---

आधीच पराभव वरुन धक्का! राजस्थानने लाखोंमध्ये पैसा मोजत खरेदी केलेल्या खेळाडूची पूर्ण हंगामातून माघार, वाचा कारण

On: मंगळवार, एप्रिल 20, 2021 11:08 PM
---Advertisement---

आयपीएलचा चौदावा हंगाम सध्या भारतात खेळवला जातो आहे. कोरोना विषाणूची परिस्थिती फारशी सुधारली नसल्याने हा हंगाम बायो बबलमध्येच खेळवला जातो आहे. मात्र अनेक खेळाडू या बायो बबलला कंटाळून माघार देखील आहेत. यात आता राजस्थान रॉयल्सच्या एका खेळाडूची भर पडली आहे. लियाम लिव्हिंगस्टोन असे या खेळाडूचे नाव आहे.

राजस्थान रॉयल्सने लिविंगस्टोनला ७५ लाखांच्या किंमतीला विकत घेतले होते. परंतु एकही सामना न खेळता तो घरी परतला आहे. लिव्हिंगस्टोनने बायो बबलला कंटाळून हा निर्णय घेतला असल्याचे समजते. राजस्थानने अद्याप त्याच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केली नाहिये.

यापुर्वी आय़पीएल २०२० मध्ये तो राजस्थान संघाचाच भाग होता. या हंगामात राजस्थानकडून ४ सामने खेळताना त्याने ७० धावांची खेली केली होती. दरम्यान ४४ ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या राहिली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---