वेस्ट इंडिजचा कायरन पोलार्ड सध्या मेजर लीग क्रिकेट 2024 मध्ये MI न्यूयॉर्ककडून खेळत आहे. स्पर्धेच्या 19 व्या सामन्यात पोलार्डनं शानदार खेळी खेळली. त्यानं 12 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं नाबाद 33 धावा केल्या. या खेळीदरम्यान पोलार्डनं मारलेल्या एका शॉटमुळे एक महिला चाहती जखमी झाली. त्यानंतर पोलार्डनं मॅचनंतर या महिला फॅनची माफी मागितली आणि तिला ऑटोग्राफही दिला. पोलार्डचा महिला चाहतीला भेटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.
पोलार्डचा हा व्हिडिओ ‘एमआय न्यूयॉर्क’च्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. पोलार्डनं लेग साईडवर शॉट खेळला आणि चेंडू थेट स्टेडियमबाहेर उभ्या असलेल्या महिला फॅनच्या खांद्यावर आदळला, असं व्हिडिओमध्ये दिसत आहे. चेंडू लागल्यानंतर महिला चाहती खूपच अस्वस्थ दिसली.
सामना संपल्यानंतर पोलार्डनं महिला चाहतीला भेटून सॉरी म्हटलं. यावेळी चाहतीनं पोलार्डच्या शॉटचं कौतुक केले. यानंतर पोलार्डनं कॅपवर सही करून ती तिला भेट दिली. त्यानंतर महिला चाहतीनं आणि तिच्या पतीनं पोलार्डसोबत सेल्फी काढला. पोलार्डनं महिलेच्या पतीलाही सॉरी म्हटलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
A GREAT GESTURE BY POLLARD. ⭐
– The ball was hit on the shoulder of the fan after a six by Pollard then Polly asked about this in post match presentation, later met the fan, gave his autograph & took a selfie as well. pic.twitter.com/OkFRhIyMMU
— Johns. (@CricCrazyJohns) July 22, 2024
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, एमआय न्यूयॉर्कनं हा सामना 4 विकेटनं जिंकला. न्यूयॉर्कनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लॉस एंजेलिस नाइट रायडर्सचा संघ 19.1 षटकांत सर्वबाद 130 धावांवर आटोपला. संघाकडून आंद्रे रसेलनं 21 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं सर्वाधिक 35 धावा केल्या. राशिद खाननं एमआय न्यूयॉर्कसाठी सर्वाधिक 3 बळी घेतले.
एमआय न्यूयॉर्कनं लक्ष्याचा पाठलाग करताना 17 षटकांत 134 धावा करून विजय मिळवला. एमआयसाठी, यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरननं 28 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 35 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली.
महत्त्वाच्या बातम्या –
‘फॅब फोर’च्या शर्यतीत विराट पडला मागे, जो रुटची मोठी आघाडी; लारा-द्रविडचा विक्रमही धोक्यात
इंग्लंडच्या विजयामुळे भारतीय संघाचं नुकसान? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल
रवींद्र जडेजाला संघातून वगळलं का? आगरकर म्हणाले, “त्याला निवडण्यात काही अर्थ…”