सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज (INDvWI) विरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळत आहे. अहमदाबाद येथे झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने निर्भेळ यश मिळवत ३-० असा मालिका विजय साजरा केला. त्यानंतर आता उभय संघांमध्ये कोलकाता येथील ईडन गार्डन्समध्ये तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाईल. या मालिकेपूर्वी वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार कायरन पोलार्ड याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला पोलार्ड?
टी२० मालिकेच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार कायरन पोलार्डने काही महत्त्वपूर्ण गोष्टी म्हटल्या. तो म्हणाला,
“आता सर्व खेळाडूंनी आयपीएल लिलावाच्या पुढे पाहिले पाहिजे. सर्व खेळाडूंनी आता आगामी टी२० मालिका जिंकण्यावर भर द्यायला हवा. आम्ही यापूर्वी इंग्लंडमध्ये टी२० मालिका जिंकून आलो आहोत. त्यामुळे येथे देखील आम्ही जिंकू असा विश्वास आहे.”
वेस्ट इंडीज संघाला वनडे मालिकेत व्हाईट वॉश मिळाला. अहमदाबाद येथे झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिज संघ एकही सामना जिंकू शकला नाही. त्याबाबत बोलताना पोलार्ड म्हणाला,
“आम्ही काहीसा निरस खेळ केला. मात्र, यामध्ये नक्कीच सुधारणा होईल. आम्हाला टी२० मालिकेत हलक्यात घेऊन चालणार नाही.”
वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर पोलार्ड हा पुढील दोन सामने खेळला नाही. त्याच्या जागी उपकर्णधार निकोलस पूरन याने संघाचे नेतृत्व केले होते. मात्र, टी२० मालिकेत पुन्हा पोलार्ड संघाची धुरा वाहिल.
टी२० मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघ-
कायरन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबियन ऍलन, डॅरेन ब्राव्हो, रोस्टन चेस, शेल्डन कॉट्रेल, डॉमिनिक ड्रेक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, ब्रँडन किंग, रोवमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, काइल मेयर्स, हेडन वॉल्श.
महत्वाच्या बातम्या-