Pollard-Pandya Controversy: आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी, मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने आपला सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा याला कर्णधारपदावरून हटवले आणि भारतीय संघााचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या जो गुजरात टायटन्सकडून ट्रेड झाल्यानंतर मुंबई इंडियन्समध्ये परतला होता, त्याला आयपीएल 2024 साठी कर्णधार म्हणून नियुक्त केले. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर टीम मॅनेजमेंटवर जोरदार टीका केली.
दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफचा भाग असलेल्या वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू केरॉन पोलार्ड (Kieron Pollard) याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे, जी पाहून चाहते मुंबई इंडियन्सच्या या निर्णयावर पोलार्ड खूश नसल्याचा अंदाज बांधत आहेत. (kieron pollard unhappy with hardik pandya becoming the captainnannounced to leave mumbai indians)
आयपीएल 2024 साठी जेव्हा मुंबई इंडियन्सला 5 वेळा आयपीएल विजेतेपद मिळवून देणारा दिग्गज क्रिकेटर रोहित शर्मा याला संघाच्या कर्णधारपदावरून काढून हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला कर्णधार म्हणून घोषित केले, तेव्हापासून मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनावर चाहत्यांमध्ये नाराजी आहे. हे स्पष्ट दिसत आहे.
दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफचा भाग असलेला वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू केरॉन पोलार्डने एका इन्स्टा स्टोरीवर एक कोट शेअर केला आहे ज्यामध्ये असे लिहिले आहे की, “जेव्हा पाऊस थांबतो, तेव्हा छत्रीचे ओझे वाटू लागते. त्याचप्रमाणे जेव्हा फायदे संपतात तेव्हा निष्ठाही संपते.”
Kieron Pollard's Instagram story. pic.twitter.com/4fyml5GPf7
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 7, 2024
कsरॉन पोलार्डच्या या इन्स्टा स्टोरीनंतर लोक याला त्याच्या मुंबई इंडियन्स फ्रँचायझीबद्दलच्या नाराजीशी जोडत आहेत. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने रोहित शर्मा (Rohit Shrama) याला कर्णधारपदावरून काढून हार्दिक पंड्याला कर्णधार बनवल्याने पोलार्ड संतापला असल्याचे चाहत्यांचे मत आहे. ज्यासाठी त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक कोट पोस्ट करून मुंबई इंडियन्सवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
2010 च्या हंगामापासून आयपीएल क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा स्टार अष्टपैलू खेळाडू केरॉन पोलार्डने 2022 च्या आयपीएल हंगामापर्यंत मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले आहे.
आयपीएल 2022 हंगामापर्यंत खेळाडू म्हणून खेळण्याव्यतिरिक्त, केरॉन पोलार्डने आयपीएल 2023 हंगामात फलंदाजी प्रशिक्षकपद भूषवले. मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू पोलार्डने आयपीएल 2020 च्या सीझनमध्ये अनेक सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले होते. (Kieron Pollard Mumbai’s Pollard’s Controversial Instagram Post See Who Was Targeted)
हेही वाचा
T20 World Cup स्पर्धेत पाहायला मिळणार ‘विराट शो’, रोहितसह संघात कमबॅक! आकडेवारी एकदा पाहाच
Sydney Test । मॅकग्रा कुटुंबीय हात मिळवण्यासाठी उत्सुक, पण रिझवानचा थेट नकार, व्हिडिओची तुफान चर्चा