इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा महासंग्राम आजपासून (०९ एप्रिल) सुरू होणार आहे. कोरोनाच्या सावटाखाली एमए चिंदबरम स्टेडियम, चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात आयपीएल २०२१ चा पहिला सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ७.३० वाजता या सामन्याला सुरूवात होणार आहे. या सामन्यात मुंबईचा विस्फोटक फलंदाज कायरन पोलार्ड याला मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
साल २०१० मध्ये पोलार्डने मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत ३३ वर्षीय पोलार्डने १६४ आयपीएल सामने खेळताना ३०२३ धावा चोपल्या आहेत. दरम्यान चौकार-षटाकारांचा वर्षाव करण्यासाठी ओळखला जाणाऱ्या पोलार्डने एकूण १९८ षटकार मारले आहेत.
अशात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्धच्या पहिल्या आयपीएल सामन्यात त्याने २ चेंडूंना सीमारेषेपार पोहोचवले तर तो आयपीएल कारकिर्दीतील २०० षटकार पूर्ण करेल. याबरोबरच आयपीएलमध्ये असा पराक्रम करणारा तो सहावाच आणि मुंबई इंडियन्सचा दुसराच फलंदाज ठरु शकतो.
इतक्या फलंदाजांनी मारलेत २०० पेक्षा जास्त षटकार
पोलार्डपुर्वी तब्बल पाच फलंदाजांनी आयपीएलमध्ये २०० पेक्षा जास्त षटकार मारण्याचा कारनामा केला आहे. विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल याबाबतीत अव्वलस्थानी आहे. त्याने २००९ ते २०२० दरम्यान १३२ आयपीएल सामने खेळताना सर्वाधिक ३४९ षटकार मारले आहेत. त्याच्यानंतर एबी डिविलियर्स २३५ षटकारांच्या दुसऱ्या स्थानावर आहे. तर एमएस धोनी (२१६ षटकार), रोहित शर्मा (२१३ षटकार) आणि विराट कोहली (२०१ षटकार) यांचाही टॉप-५ मध्ये समावेश आहे.
मुंबई इंडियन्सची संभावित प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डीकॉक, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कायरन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, पियूष चावला आणि जिम्मी नीशम
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची संभावित प्लेइंग इलेव्हन
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पड्डीकल, एबी डिविलियर्स, युझवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, कायल जेमीसन, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी आणि रजत पाटीदार
महत्त्वाच्या बातम्या-
‘पन्नास खेळाडू मिळूनही पंतसारखी फलंदाजी करु शकत नाहीत,’ जगातील अव्वल गोलंदाजाने केली स्तुती
अरे व्वा! केवळ हिंदी, मराठी नव्हे तर ‘या’ ८ भाषांमध्ये ऐकायला मिळणार आयपीएल सामन्यांचा थरार






