Virat Kohli Autograph in RCB Jersey: जगभरात कोट्यवधी क्रिकेटप्रेमी आहेत. मात्र, त्यातील सर्वांनाच आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला भेटून त्याचा ऑटोग्राफ घेण्याची संधी मिळत नाही. काहींनाच ही संधी मिळते. भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याचेही जगात कोट्यवधी चाहते आहेत. विराट आपल्या चाहत्यांना कधीही निराश करत नाही. सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराटने आपल्या चिमुकल्या चाहत्याची इच्छा पूर्ण केली. विराटने एका आरसीबी फॅन याला दुसऱ्या दिवशी खेळापूर्वी ऑटोग्राफ दिला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
विराटने दिला ऑटोग्राफ, फोटोही काढला
विराट कोहली (Virat Kohli) याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाच्या चाहत्याला आरसीबीच्या जर्सीवर आपला ऑटोग्राफ दिला. एवढंच नाही, तर विराटने फॅनसोबत फोटोही काढला. विराटचा हा अंदाज क्रिकेटप्रेमींच्या पसंतीस पडल्याचे दिसत आहे. नेटकरी हा व्हिडिओ शेअर करत किंग कोहलीचे कौतुक करत आहेत.
ಕಣ ಕಣದಲ್ಲೂ ಕೆಂಪು 😍@imVkohli #SAvIND #Bangalore #KingKohli pic.twitter.com/oSMbjvGr6E
— Star Sports Kannada (@StarSportsKan) December 27, 2023
विराटची खेळी
सेंच्युरियन कसोटी (Centurion Test) सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहली याला मोठी खेळी करता आली नाही. त्याने 64 चेंडूंचा सामना करताना 38 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत 5 चौकारांचा समावेश होता. विराट शानदार लयीत खेळत होता, पण कागिसो रबाडाच्या चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली.
विराटने 38 धावांची खेळी करत जागतिक कसोटी अजिंक्यपद (World Test Championship) स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्याचा मान मिळवला. त्याने रोहित शर्मा (Rohit Sharma) याला पछाडले आहे. विराटच्या नावावर 2101 धावा आहेत, तर 2097 धावांसह रोहित दुसऱ्या स्थानी आहे. या यादीत 1769 धावांसह चेतेश्वर पुजारा तिसऱ्या स्थानी आहे. तसेच, विराट कोहली दक्षिण आफ्रिका (Virat Kohli South Africa) संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत राहुल द्रविड याच्याही पुढे गेला आहे.
भारत 245 धावांवर सर्वबाद
भारतीय संघाने पहिल्या डावात 245 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. भारताकडून यावेळी केएल राहुल याने 101 धावांची खेळी साकारत शतक ठोकले. राहुलव्यतिरिक्त विराटने 38, श्रेयस अय्यरने 31 आणि शार्दुल ठाकूरने 24 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून रबाडाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. नांद्रे बर्गरने 3 विकेट्स, तर मार्को यान्सेन आणि गेराल्ड कोएट्जी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात डीन एल्गर (Dean Elgar) याच्या शतक (140) खेळीच्या जोरावर सामन्यात 11 धावांची आघाडी घेतली आहे. (king virat kohli giving his autograph in a rcb jersey to a young rcb fan see video)
हेही वाचा-
अर्रर्र! KBCमध्ये 13व्या प्रश्नावर इशान-स्मृतीने सोडला खेळ, सचिनविषयी होता प्रश्न; जिंकले असते ‘एवढे’ लाख
Boxing Day Test । डीन एल्गरच्या शतकामुळे दक्षिण आफ्रिका मजबूत स्थितीत, घेतली ‘इतक्या’ धावांची आघाडी