विराट कोहली याच्यासाठी गुरुवारचा (दि. 18 मे) आयपीएल 2023चा 65वा सामना खूपच खास ठरला. या सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना विराटने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खणखणीत शतक ठोकत संघाला विजय मिळवून दिला. हे त्याचे आयपीएलमधील 6वे शतक ठरले. या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने हेन्रीच क्लासेन याच्या शानदार शतकाच्या जोरावर 187 धावांचे आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विराट आणि फाफ डू प्लेसिस यांच्या 172 धावांच्या भागीदारीने आरसीबी संघाने 8 विकेट्सने सामना जिंकला. तसेच, प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. या सामन्यातील शतकानंतर सचिन तेंडुलकर आणि एबी डिविलियर्स यांनी विराटचं कौतुक केलं.
विराट कोहली (Virat Kohli) याचे हे शतक अशा सामन्यात आले, जिथे संघाला त्याची सर्वाधिक गरज होती. विराटने 62 चेंडूंचा सामना करताना 4 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने आयपीएलमधील 6वे शतक झळकावले. विराटच्या या खेळीवर क्रिकेट जगतातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सचिन तेंडुलकरपासून ते एबी डिविलियर्स याच्यापर्यंत अनेकांनी किंग कोहली याचे कौतुक करत ट्वीट केले.
विराटच्या शतकाचे कौतुक करताना सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने मोठे ट्वीट केले. मास्टर ब्लास्टर ट्वीटमध्ये म्हणाला की, “विराटने जेव्हा पहिल्या चेंडूवर कव्हर ड्राईव्ह खेळला, तेव्हा स्पष्ट झाले होते की, हा दिवस विराटचा असेल. विराट आणि फाफ दोघेही पूर्ण नियंत्रणात दिसले. त्यांनी फक्त मोठे शॉट्सच खेळले नाहीत, तर एक यशस्वी भागीदारी बनवण्यासाठी खेळपट्टीवर धावलेदेखील. ज्याप्रकारे दोघांनी फलंदाजी केली, त्यांच्यासाठी 186 धावांचे आव्हान पुरेसे नव्हते.”
It was evident that this would be Virat’s day from the very first ball when he played that cover drive.
Virat and Faf both looked in total control, they not only played many big shots but also ran rather well between the wickets to build a successful partnership.
186 wasn’t a… pic.twitter.com/YpIFVroZfi
— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 18, 2023
‘मिस्टर 360’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एबी डिविलियर्स यानेही विराटचे कौतुक केले. त्याने ट्वीट करत लिहिले की, “VIRAAAAAAAAAAT, फाफचीही शानदार खेळी. चांगली भागीदारी. हा संघ भूकेला दिसत आहे. मी उत्साहित आहे.”
VIRAAAAAAAAAAAT💪💪💪
— AB de Villiers (@ABdeVilliers17) May 18, 2023
याव्यतिरिक्त सुरेश रैना (Suresh Raina) यानेही ट्वीट करत लिहिले की, “क्रिकेटचा काय शानदार दिवस आहे. विराटने त्याच्या दर्जा आणि दृढ संकल्प दाखवत आणखी एक शानदार शतक केले. शानदार प्रतिभा.”
What a day of cricket! 🔥🏏 @imVkohli brings up yet another magnificent century, showcasing his class and determination. True batting genius! 👏 And a huge shout out to @faf1307 for an absolute gem of an innings ❤️#RCBvSRH #IPL2023 pic.twitter.com/lJo3zL0AzA
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) May 18, 2023
तसेच, वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) हा ट्वीट करत म्हणाला की, “विराटचे त्याच्या अंदाजात आयपीएलचे 6वे शतक. विराट त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे आणि फाफसाठी काय शानदार हंगाम आहे.”
6th IPL century in style. #ViratKohli at his best . And what a great season for Faf. #SRHvRCB pic.twitter.com/a4cQhm9R0d
— Virender Sehwag (@virendersehwag) May 18, 2023
आरसीबी संघाच्या पुढील सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर हंगामातील अखेरच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. गुजरात टायटन्स संघ आमने-सामने असणार आहेत. हा सामान 21 मे रोजी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर पार पडणार आहे. या सामन्यातही आरसीबीला विराटकडून अशाच खेळीची अपेक्षा असेल. (king Virat kohlis century won sachin abds heart see tweets here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटच्या शतकावर आख्ख्या जगाने पाडला कौतुकाचा पाऊस, पण पत्नी अनुष्कानं केलेलं कौतुक जगात भारी; वाचाच
जबरदस्त योगायोग! 18 नंबरची जर्सी घालून विराटने 18 मे रोजी ठोकली 2 IPL शतके, हातावर लागलेले 9 टाके