आयपीएलमधील किंग्ज ११ पंजाब संघाने ११ खेळाडूंना २०१९ आयपीएल करारातून मुक्त केले आहे. यात युवराज सिंग, अक्षर पटेल आणि अॅराॅन फिंचचा समावेश आहे.
युवराज सिंगने २०१८च्या आयपीएल हंगामात ६ सामन्यात ६५ धावा केल्या होत्या. तसेच तो गेले काही महिने भारतीय संघ तसेच पंजाब संघाच्याही बाहेर आहे. त्यामुळे त्याला संघात कायम ठेवण्यात न आल्याचे टाईम्स आॅफ इंडियातील एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
१० सामन्यात १३५ धावा करणाऱ्या आणि सध्या जबरदस्त फाॅर्मात असलेल्या अॅराॅन फिंचलाही संघातील आपले स्थान गमवावे लागले आहे.
अक्षर पटेल हा २०१८ हंगामासाठी पंजाबने लिलावापुर्वीच संघात कायम केले होते. परंतु संघात सतत संधी देऊनही त्याला विशेष चमक दाखवता आली नाही. त्याने ९ सामन्यात केवळ ३ विकेट्स घेतल्या तसेच केवळ ८० धावा केल्या.
याशिवाय बरिंदर श्रान, मनोज तिवारी, मोहित शर्मा, मन्सूर दार, बेन ड्वार्शयस, आकाशदीप नाथ आणि मयांक डागर या खेळाडूंचाही करार कायम करण्यात आला नाही.
वाचा महत्त्वाच्या बातम्या-
–का सचिनचा आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा सामना भारतीयांना पाहता आला नव्हता?
–रुट- कोहलीबरोबर घडला क्रिकेटमधील सर्वात वेगळा योगायोग
–१६१ कसोटीत कूकला जे जमले नाही ते सॅम करनने ७ कसोटीत करुन दाखवले