पल्लेकेल | इंग्लंड विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु त्यांचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला आहे.
सध्या इंग्लंडने ७२.४ षटकांत ९ बाद २७८ धावा केल्या आहेत. यावेळी अडचणीत असलेल्या संघाच्या मदतीला पुन्हा सॅम करन आला.
त्याने आज तळाच्या फलंदाजाबरोबर फलंदाजी करत संघाला अडचणीतून बाहेर काढले. एकवेळ ६ बाद १६५ अशी अवस्था इंग्लंडची होती.
करनने आज १०४ चेंडूत नाबाद ५९ धावांची खेळी केली आहे. यात करनने ६ षटकार खेचले आहे.
याबरोबर करनने काही पराक्रमही केले आहेत. ते असे
-कारकिर्दीतील पहिली तीन अर्धशतकं करताना त्याने षटकार मारला आहे. अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव खेळाडू
-कसोटी कारकिर्दीतील शेवटच्या ११पैकी ९ डावात करनने कमीतकमी २० धावा केल्या आहेत. एका डावत तो ० धावेवर बाद तर एका डावात एकही चेंडू न खेळता तो नाबाद राहिला.
-कसोटीत ५० धावा करताना सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आता करनच्या नावावर झाला आहे. त्याने आज अर्धशतकी खेळीत तब्बल ६ षटकार खेचले.
वाचा महत्त्वाच्या बातम्या-
–डिव्हिलियर्स वादळाचा तडाखा, केले शानदार पुनरागमन
–बालदिनाचे औचित्य साधून केकेआरने केले हे खास सेलिब्रेशन, पहा फोटो...
–सुरेश रैनाचा रणजी ट्राॅफीमधील हा कहर कॅच पाहिलाय का?
–हा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ सांगतो, धोनी धोनी हैं!
–युझवेंद्र चहलचे टीम इंडियातील हे तीन खेळाडू आहेत दादा