भारताच्या किरण जॉर्जने (Kiran George) आपली धावगती कायम ठेवत गुरुवारी (1 जून) ला जागतिक क्रमवारीत 26व्या स्थानी असलेल्या चीनच्या वेंग हाँग यांगचा (Weng Hong Yang) सरळ गेममध्ये पराभव करत थायलंड ओपन सुपर 500 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत 59व्या स्थानावर असलेल्या किरणने पुरुष एकेरीच्या 16व्या फेरीत आपल्या उच्च मानांकित चिनी प्रतिस्पर्ध्याला 21-11, 21-19 असे पराभूत करण्यासाठी 39 मिनिटे घेतली. BWF वर्ल्ड टूर सुपर 500 स्पर्धेत किरणने उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ. तर चला जाणून घेऊ स्पर्धेचा आराखडा. विजेत्या किरणचा शुक्रवारी शेवटच्या आठ सामन्यात हाँगकाँगच्या एनजी का लाँग एंगस आणि फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्ह यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.
अस्मिताला पराभव स्वीकारावे लागले
महिला एकेरी सामन्यात अस्मिता चालिहाला (Asmita Chaliha) प्री-क्वार्टर फायनलमध्ये ऑलिम्पिक आणि तीन वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या स्पेनच्या कॅरोलिना मारिनकडून 18-21,13-21 असा पराभव पत्कारावा लागला. दरम्यान, स्लोव्हेनिया ओपन जिंकणारा माजी खेळाडू जागतिक क्रमवारीत 11 व्या क्रमांकावर असलेल्या समीर वर्मालाही डोन्मार्कच्या मॅग्नस जोहानसेनकडून 15-21, 15-21 असा पराभव पत्कारावा लागला. (Badminton Tournament)
पहिल्या फेरीत पीव्ही सिंधू बाहेर
बुधवारी (31 मे) ला माजी विश्वविजेती पीव्ही सिंधूला (PV Sindhu) 62 मिनिटे चाललेल्या पहिल्या फेरीच्या लढतीत कॅनडाच्या मिशेल ली विरुद्ध 8-21, 21-18, 18-21 असा पराभव पत्कारावा लागला. दरम्यान, टोकियो ऑलिम्पियन प्रणीतलाही फान्सच्या क्रिस्टो पोपोव्हविरुद्ध 14-21, 16-21 असे पराभूत व्हावे लागले. ऑर्लिन्स मास्टर्सचा विजेता प्रियांशू राजावतही पहिल्या फेरीतच पराभूत झाला.
सायना बिंग जिओसोबत खेळताना दिसणार
अश्मिताचा सामना रिओ ऑलिम्पिक चॅम्पियन स्पेनच्या कॅरोलिना मारिनशी तर सायनाचा नेहवाल (Saina’s Nehwal ) सामना चीनच्या हि बिंग जिओशी होणार आहे. 21-7, तर अश्मिताने देशबांधव मालविका बनसोडचा 21-17, 21-14 असा पराभव केला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
‘या’ क्लबकडून खेळताना दिसणार मेस्सी? कराराचा आकडा ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
WTC Final : टीम इंडियासाठी ‘हा’ पठ्ठ्या ठरू शकतो ‘एक्स फॅक्टर’, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितलं नाव