मुंबई । सुशांत सिंग राजपूत याने 2016 साली भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी यांच्यावर आधारित ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत काम केले. या चित्रपटामुळे त्याचे खूप कौतुक करण्यात आले होते. या चित्रपटात सुशांतने धोनी सारखी स्टाईल करणं, चालणं, बोलणं आणि त्याच्या सारखाच फटका मारण्याची कला अभिनयातून साकार केली होती.
धोनीसारखा अभिनय सुशांतने करावा यासाठी भारताचा माजी यष्टिरक्षक आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांनी मेहनत घेतली होती. धोनी सारखा हुबेहूब अभिनय करता यावा यासाठी सुशांतही नेट्सवर तासंतास मेहनत करायचा. त्याच्या मेहनतीमुळेच हा चित्रपट यशस्वी ठरू शकला. सुशांतने आत्महत्या केल्याची बातमी कळताच किरण मोरे धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.
किरण मोरे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की , “हा माझ्यासाठी धक्कादायक क्षण आहे. सुशांतच्या परिचयातील लोकांना या घटनेमुळे दुःखातून बाहेर पडणे फारच अवघड आहे. खूप लवकर जाण्याची घाई केलास मित्रा. श्रद्धांजली!”
It is a shocking moment for me personally, @itsSSR was someone whom I trained for the role as @msdhoni. I don't know how I or anyone who knows him will be able to recover from this shock, gone too soon my friend #SushantSinghRajput #RIPSushant
— Kiran More (@JockMore) June 14, 2020
किरण मोरे यांनी सुशांतला महेंद्रसिंग धोनीसारखे बनवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. धोनीचा प्रत्येक शॉट सुशांतला खेळवण्यासाठी ते सातत्याने मेहनत घेतले. किरण मोरे यांच्या मदतीमुळेच धोनी निर्मिती ‘हेलिकॉप्टर शॉट’ सुशांत हुबेहूब चित्रपटात मारला होता. हेलिकॉप्टर शॉट शिकत असताना सुशांतला अनेकदा दुखापतही झाली होती.