नवी दिल्ली। चेंडू छेडछाड हा एक असा गुन्हा आहे, जे आयसीसी अतिशय गंभीरतेने घेते. परंतु चेंडू छेडछाडीकडे काही दशकांपूर्वी एक कला म्हणून पाहिले जात होते. याबद्दल भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांनी खुलासा केला आहे.
मोरे (Kiran More) म्हणाले, १९८९ मध्ये भारत आणि पाकिस्तान मालिकेत चेंडू छेडछाड (Ball Tampering) ही खूप साधारण बाब होती. तरीही त्यावेळी कोणताही संघ विरोधी संघाबद्दल तक्रार करत नसायचा.
मोरे यांनी ग्रेटेस्ट रायवलरी पॉडकास्टमध्ये म्हटले, “त्या काळात चेंडू छेडछाड करण्याची परवानगी होती. त्यामुळे चेंडू रिव्हर्स स्विंग व्हायचा. दोन्हीही संघ एकमेकांची तक्रार करत नसायचे. प्रत्येकजण चेंडू घासत असायचा. तसेच रिव्हर्स स्विंग करत असायचा. त्यावेळी फलंदाजी करणे कठीण असायचे. आमच्या संघात मनोज प्रभाकरदेखील चेंडूला घासणे शिकले होते आणि आपल्या रिव्हर्स स्विंगने पाकिस्तानच्या फलंदाजांना त्रास देत होते.”
पंचांनाही काहीच करता येत नव्हते
मोरे यांनी खुलासा करत पुढे म्हटले, “पंचांना त्यावेळी काहीच करता येत नव्हते. अधिकाऱ्यांनी कर्णधार कृष्णमचारी श्रीकांत आणि इम्रान खान यांच्याशी चर्चा केली. परंतु त्यामध्ये अधिक अंतर नव्हते.”
ही ती मालिका होती ज्यामध्ये सचिन तेंडुलकर आणि वकार युनूसने पदार्पण केले होते. त्या मालिकेतील ४ही कसोटी सामने अनिर्णित राहिले होते.
आता तर फक्त कॅमेरेच कॅमेरे आहेत
मोरे यांच्या मते, एक काळ असा होता जेव्हा चेंडू छेडछाडला फार गांभीर्याने घेतले जात नव्हते. परंतु आता गोष्टी पूर्णपणे बदलल्या आहेत. सध्याच्या क्रिकेटमध्ये सगळीकडे कॅमेरे लावलेले असतात. आणि तुम्ही कोणतीही लहानशी चूक केली तर वाचू शकत नाही. सर्वकाही कॅमेऱ्यांमध्ये टिपले जाते.
ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमरॉन बॅनक्रॉफ्टबरोबरही असेच काही झाले होते, जेव्हा त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान खिश्यातून हळूच सँड पेपर काढून चेंडूशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. आणि या काही सेकंदाचे कृत्यही कॅमेऱ्यामध्ये टिपले गेले आणि त्यानंतर स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट या ३ खेळाडूंवर जवळपास एका वर्षाची बंदी घातली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
-वसीम जाफरला या खेळाडूंमध्ये दिसते सेहवागची झलक
-Video: रांचीत धोनीने असा साजरा केला आपला वाढदिवस, घ्या जाणून
-या कारणामुळे वाचले गावसकर, नाहीतर बनले असते थेट मच्छीमार…