आयपीएल संपताच भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यात होणाऱ्या टी२०, वनडे आणि कसोटी मालिकांसाठी काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. पण यावेळी भारतीय संघातून काही नावे वगळण्यात आली होती. वगळण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये केदार जाधव आणि शिवम दुबे यांचाही समावेश आहे. त्यांना संघातून वगळण्यामागे काय कारणे असू शकतात, याबद्दल जी यष्टीरक्षक किरण मोरे यांनी मत मांडले आहे.
संपूर्ण आयपीएल हंगामात केदार जाधव समाधानकारक कामगिरी करू शकला नाही. केदार जाधवला मधल्या फळीत फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. मात्र, तो त्यात अपयशी ठरला, असे किरण मोरे यांनी म्हटले आहे. केदारला वरच्या फळीत खेळण्याची संधी मिळाली असती तर त्याने उत्तम खेळ केला असता असाही विश्वास मोरे यांचा होता.
तसेच शिवम दुबेने न्यूझीलंड दौऱ्यावर उत्तम प्रदर्शन केले होते. मधल्या फळीत त्याने प्रशंसनीय कामगिरी केली होती. परंतू लॉकडाऊनमुळे पडलेल्या मोठ्या अंतरानंतर आयपीएलमध्ये विशेष असे प्रदर्शन तो करू शकला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी शिवम दुबेचा विचार केला गेला नाही. परंतु शिवम दुबेकडे अजून खूप कालावधी असून तो बराच पुढे जाऊ शकतो असा विश्वास किरण मोरे यांनी व्यक्त केला.
भारताचा संघ 11 किंवा 12 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारत 3 वनडे, 3 टी-20 आणि 4 कसोटी सामने खेळणार आहे. या दरम्यान 2 महिने 1 आठवडा भारताचा संघ या दौऱ्यावर असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Qualifier 2 : हैदराबाद-दिल्ली येणार आमनेसामने, ‘हा’ महत्वाचा खेळाडू सामन्याला मुकणार?
बापरे! धोनीची एक धाव सीएसकेला पडली ७.५ लाखांना, तर १ कोटी ४१ लाखांना ‘या’ गोलंदाजाची विकेट
…आणि मनीष पांडेने केली विराट कोहलीची बोलती बंद, पाहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख –
जोडी नंबर वन! सचिन-द्रविड जोडीने २१ वर्षांपूर्वी ऐतिहासिक भागीदारी करत रचला होता इतिहास
भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या ब्रेट लीबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?