---Advertisement---

‘माझे कोणी चांगले फोटोच काढत नाही’, विराट-अनुष्काचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरची तक्रार

On: रविवार, नोव्हेंबर 8, 2020 3:41 PM
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने नुकताच ५ नोव्हेंबरला त्याचा ३२ वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाचे खास सेलिब्रेशन झाले होते. या सेलिब्रशनसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे खेळाडू तसेच विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील उपस्थित होती.

विराटच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे तसेच विराट आणि अनुष्काचेही अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. पण हे फोटो काढणारा बेंगलोर संघाचा फोटोग्राफर मोहित कश्यपचा मात्र कोणीही यावेळी चांगला फोटो काढला नाही, याबद्दल त्याने गमतीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

फोटोग्राफर नेहमीच सर्वांचे सुंदर फोटो काढतो, मात्र जेव्हा त्याचे फोटो कोणी काढतात तेव्हा मात्र काहीतरी समस्या होतात. हेच या मोहितने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमधून गमतीने मांडले आहे. त्याने विराट आणि अनुष्काबरोबर त्याचे २ फोटो शेअर केले आहेत. तसेच पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने म्हटले आहे की “जेव्हा लोकं मला विचारतात की तुझ्याकडे तूझे चांगले फोटो का नाही? तेव्हा माझे बऱ्याचदा हेच उत्तर असते की कोणीही माझे चांगले फोटो काढत नाही. म्हणूनच आता मी हे सिद्ध करत आहे.”

त्याच्या म्हणण्याप्रमाणे खरंच त्याने पोस्ट केलेल्या पहिल्या फोटोमध्ये विराट, अनुष्का आणि मोहित या तिघांचाही चेहरा नीट दिसत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर खुप प्रकाश पडला आहे. हाच फोटो मोहितने चांगल्याप्रकारे नंतर एडिट केला आणि तो फोटोही पोस्ट केला आहे. या दोन फोटोंबद्दलची माहिती देखील त्याने त्याच्या कॅप्शनमधून दिली आहे. त्याने लिहिले की “१. माझा काल रात्रीचा सर्वोत्तम फोटो. २. मी करु शकलेलो सर्वोत्तम दुरुस्ती. विराट तुला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा.”

https://www.instagram.com/p/CHNRcjbHQdb/

विराट कोहलीचे वाढदिवसाचे सेलिब्रेशन धुमधडाक्यात जरी झाले असले तरी मात्र ६ नोव्हेंबरला त्यांचा सनरायझर्स हैदराबादविरुद्ध एलिमिनेटर सामन्यात पराभव झाला. त्यामुळे त्यांचे आयपीएल २०२० मधील आव्हान संपुष्टात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून ‘या’ दोन शिलेदारांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मिळाले नाही टीम इंडियात स्थान, दिग्गजाने सांगितले कारण

Qualifier 2 : हैदराबाद-दिल्ली येणार आमनेसामने, ‘हा’ महत्वाचा खेळाडू सामन्याला मुकणार?

…आणि मनीष पांडेने केली विराट कोहलीची बोलती बंद, पाहा व्हिडिओ

ट्रेंडिंग लेख –

जोडी नंबर वन! सचिन-द्रविड जोडीने २१ वर्षांपूर्वी ऐतिहासिक भागीदारी करत रचला होता इतिहास

भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या ब्रेट लीबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?

पुरुषांच्या विश्वचषकादरम्यान टिकेला सामोरी गेलेल्या ‘तिनेच’ भारतीय महिला क्रिकेटसाठी दिले मोठे योगदान

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---