भारतीय महिला क्रिकेट संघ सप्टेंबरमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. १० सप्टेंबरपासून दोन्ही देशांदरम्यान ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. नागालँडचा फलंदाज किरण नवगिरे हिचा प्रथमच संघात समावेश करण्यात आला आहे. अलीकडच्या काळात किरणने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पॉवर हिटर फलंदाज म्हणून तिची ओळख मजबूत केली आहे. याच कारणामुळे तिला प्रथमच भारतीय संघात स्थान मिळाले.
उजव्या हाताची फलंदाज किरण नवगिरे ही मूळची महाराष्ट्राची आहे. पण, नागालँडच्या वतीने देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. क्रिकेटर होण्याआधी किरणने ट्रॅक आणि फील्डच्या अनेक इव्हेंटमध्ये हात आजमावला आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. जेव्हा तिने विद्यापीठात शिक्षण घेतले तेव्हा तिने विविध ऍथलेटिक्स स्पर्धांमध्ये १०० हून अधिक पदके जिंकली. त्यात २०११-१२ मधील युनिव्हर्सिटी गेम्समध्ये भालाफेकमधील सुवर्णपदकाचाही समावेश आहे. किरण महेंद्रसिंग धोनीची फॅन असूनही क्रिकेट ही तिची दुसरी पसंती राहिली.
किरण हौस म्हणून क्रिकेट खेळत असे
२०१६मध्ये, वयाच्या २२व्या वर्षी, किरणला क्रिकेट खेळातील तिची क्षमता लक्षात आली आणि ५ वर्षानंतर ती आता इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय टी-२० संघात सामील झाली. तिचे प्रशिक्षक गुलजार शेख यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “ती पुण्यातील आझम स्पोर्ट्स अकादमी येथे युनिव्हर्सिटी गेम्समध्ये भाग घेत होती. त्यानंतर मी पहिल्यांदा तिला लांब षटकार मारताना पाहिले. किरणचा पॉवर हिट मारताना पाहून मी थक्क झालो. यानंतर मी आणि आमचे अध्यक्ष किरणला भेटायला गेलो आणि तिला विचारले की ती कोणत्या क्लबमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे.”
किरणने दिलेले उत्तर ऐकून प्रशिक्षक आणखीनच चकित झाले. तेव्हा किरण म्हणाली होती, “सर, मी कोणत्याही क्लबमध्ये खेळत नाही. मी फक्त मनोरंजनासाठी क्रिकेट खेळते. मला ऍथलेटिक्समध्ये काहीतरी करायचे आहे. असेही, क्रिकेट हा खूप महागडा खेळ आहे.”
प्रशिक्षकांनी किरणला मोफत क्रिकेट प्रशिक्षण दिले
प्रशिक्षक गुलजार शेख म्हणाले की, “किरणचे ऐकल्यानंतर मी माझ्या अध्यक्षांकडे पाहिले आणि आम्ही दोघेही क्षणार्धात म्हणालो, तिला स्वतःच्या क्षमतेबद्दल माहिती नाही. प्रशिक्षणासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत, असे प्रशिक्षकाने सांगितल्यानंतरच किरणने क्रिकेटला गांभीर्याने घेण्याचे मान्य केले. किरण सोलापूरची आहे. तिचे आई-वडील दोघेही शेतकरी आहेत. मला आठवते, तेव्हा मी तिला सांगितले होते की, तू फक्त आमच्या अकादमीत ये आणि क्रिकेट खेळ, तुझ्या प्रत्येक गरजेची काळजी घेतली जाईल.”
किरणने टी-२० मध्ये १५० धावांची इनिंग खेळली आहे
पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनने २०१६-१७ मध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेत किरणने ५ सामन्यात ४२९ धावा केल्या. २०१७मध्येच त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली होती. पण, तिथे फारशी संधी न मिळाल्याने तो नागालँडकडे वळाली. हा निर्णय त्याच्यासाठी आयुष्य बदलणारा ठरला. अरुणाचलविरुद्धच्या ७६ चेंडूत १६२ धावांसह ५२५ धावांसह किरणने यंदाच्या वरिष्ठ महिला टी-२० ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. टी-२० मध्ये १५० पेक्षा जास्त धावा करणारी ती एकमेव भारतीय पुरुष किंवा महिला क्रिकेटपटू आहे. किरणने एकटीच्या जोरावर नागालँडला उपांत्यपूर्व फेरीत नेले होते. उपांत्यपूर्व फेरीत केरळविरुद्ध तिने ५६ धावा केल्या होत्या. हे तिचे चौथे अर्धशतक होते. मात्र, त्यांचा संघ हा सामना हरला.
महिला टी-२० चॅलेंजमध्ये तुफानी फलंदाजी केली
२०२२च्या महिला टी-२० चॅलेंजमध्ये ती वेग संघाचा भाग होती. ट्रेलब्लेझर्सविरुद्ध त्याने ३४ चेंडूंत ५ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ६९ धावा केल्या. तिने २५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या कामगिरीमुळे त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले.
क्रिकेटमध्ये शॉट पुट आणि भाला फेकण्याचे फायदे
किरणचे प्रशिक्षक गुलजार शेख म्हणतात की, “ती महेंद्रसिंग धोनीची खूप मोठी फॅन आहे. २०११च्या विश्वचषक फायनलमध्ये धोनीच्या विजयी षटकाराची ती दररोज नेटमध्ये कॉपी करण्याचा प्रयत्न करते. ती नैसर्गिक पॉवर हिटर आहे. तिच्याकडे लाँग शॉट्स खेळण्याची ताकद कुठून येते? याचे नेमके कारण मला माहीत नाही, पण तिने मला एकदा सांगितले की ती लहानपणापासून शेतात काम करते आणि भालाफेक, शॉट पुट यांसारख्या खेळांचा भाग आहे. कदाचित हेच तिच्या पॉवर हिटिंगचे रहस्य असावे.”
दरम्यान, आता इंग्लंड दौऱ्यावर किरणला आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळए इतक्या वर्ष प्रतिक्षाकेल्यानंतर आणि सोलापूर ते नागालँड आणि नागालँड ते थेट भारतीय महिला संघ असा प्रवास करणारी किरण या मिळालेल्या संधीचे सोनं नक्की करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
सर्व सहभागी संघ ते वेळापत्रक, एकाच क्लिकवर जाणून घ्या एशिया कप २०२२ बद्दल सर्वकाही
संजूच्या यष्टीरणाची बात काही औरच! चित्यासारखी चपळता दाखवत एका हाताने घेतला झेल
आताची लहान पोरंही फाडफाड इंग्लिश बोलतात! तोडक्यामोडक्या इंग्रजीमुळे आझमचं होतंय हसू, तुम्हीही पाहा