---Advertisement---

‘धोनीसारखा व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करत असेल तर अजून काय हवं,’ सीएसकेच्या युवा खेळाडूची प्रतिक्रिया

On: रविवार, मे 23, 2021 9:18 AM
---Advertisement---

आयपीएल 2020च्या लिलाव प्रक्रियेदरम्यान चेन्नई सुपर किंग्ज संघाने तामिळनाडूचा युवा फिरकीपटू साई किशोरला आपल्या संघात निवडले होते. किशोरला अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. मात्र कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात त्याच्या खेळात सुधारणा होत झाल्याची कबुली स्वतः त्याने दिली आहे.

अनेक क्रिकेट पंडितांनी या आधीच स्पष्ट केले आहे की, धोनीच्या मार्गदर्शनाचा युवा खेळाडूंना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. एक प्रकारे धोनी हा फिरकी गोलंदाजांसाठी वरदानच आहे. धोनीच्या मार्गदर्शनात रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादवसारख्या अनेक युवा फिरकी गोलंदाजांनी भारतीय संघासाठी शानदार कामगिरी केलेली आहे.

किशोर स्पोर्ट्सकिडाला दिलेल्या एका खास मुलाखतीत म्हणाला की, “मी दररोज क्रिकेट खेळतो आहे आणि काहीतरी नवीन शिकतो आहे. जेव्हा तुम्ही धाकड प्रतिस्पर्धीविरुद्ध खेळता तेव्हा आपोआपच तुमच्यात सुधारणा होते. एक क्रिकेटपटू म्हणून मार्च 2020 ते मे 2021 या काळात माझ्या खेळामध्ये बरीच सुधारणा झाली आहे.”

किशोर पुढे म्हणाला, “एकंदरीतच सीएसके संघात आल्यापासून माझा खेळ हा एका वेगळ्या स्तरावर गेला आहे. जेव्हा महेंद्रसिंग धोनी सारखा व्यक्ती तुम्हाला सतत अभिप्राय देत असेल तर तुम्हाला आणखी काय हवे आहे?”

दरम्यान आयपीएल 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा विचार केला असता, संघाने संपूर्ण स्पर्धेदरम्यान शानदार कामगिरी केली. कर्णधार महेंद्रसिंग धोनी फलंदाजीत फॉर्ममध्ये नसताना देखील त्याने ज्याप्रमाणे संघाचे नेतृत्व केले, त्याचा संघाला फार फायदा झाला. गेल्या हंगामात चेन्नई संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर होता आणि प्लेऑफमध्ये ते प्रथमच स्थान मिळवू शकले नव्हते.

यावर्षी देखील संघाला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश येईल असा अनेक क्रिकेट पंडितांनी अंदाज वर्तवला होता. परंतु चेन्नईने स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी 7 सामन्यांमध्ये 5 विजयांसह गुणतालिकेत दुसरे स्थान प्राप्त करत त्यांचे अंदाज चुकीचे ठरवले.

महत्त्वाच्या बातम्या-

WTC Final: न्यूझीलंडने एका झटक्यात तोडले होते विराट ब्रिगेडचे ‘मोठे स्वप्न’; आता करणार व्याजासकट परतफेड?

असा प्रतिभाशाली मुंबईकर, ज्याला भारतीय संघ दूरच आयपीएलमध्येही मिळाली नाही पुरेशी संधी

प्रतिभेची खाण! अवघ्या १७ सामन्यात ११७ विकेट्स अन् ६३१ धावा, ‘हा’ अष्टपैलू ठोठावतोय टीम इंडियाचं दार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---