२०१० मध्ये ऑस्ट्रेलियाच्या वर्तमानपत्रात नवीन लेग स्पिनरच्या बातम्या येत होत्या. २० वर्षीय लेगस्पिनर, ज्याला शेन वॉर्न (Shane Warne) जास्त पसंद करायचा. फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीला त्याने टी-२० सामन्यात पदार्पण करत आपल्या फिरकी गोलंदाजीने पाकिस्तानविरुद्ध दोन बळी घेतले. त्याच महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यात त्याचे पदार्पण होणार होता. पण पदार्पणाच्या एक दिवस आधी ‘क्रिकइन्फो’ वर एक लेख प्रसिद्ध झाला होता. माहित नाही की या स्पिनरने तो लेख वाचला होता की नाही. जर ते वाचला असेल तर त्याच्या धैर्याचे कौतुक करावे लागेल.
लेखात असे लिहिले होते की शेन वॉर्ननंतर एकही ऑस्ट्रेलियन लेग स्पिनर वनडे क्रिकेटमध्ये टिकू शकला नाही. मग ते स्टुअर्ट मॅकगिल (Stuart MacGill), कॅमेरून व्हाईट (Cameron White) किंवा पाकिस्तानचा दानिश कनेरिया (Danish Kaneria) असो. स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) नावाच्या या फिरकीपटूने अशा वातावरणात पदार्पण केले. तेव्हा न्यू साउथ वेल्सकडून खेळणाऱ्या स्मिथने ११ प्रथम श्रेणी सामन्यात २ शतके ठोकली होती. पण त्याची ओळख अद्याप लेगस्पिनर म्हणूनच होती.
दादाने ओळखले-
स्मिथने मर्यादित षटकात पदार्पणानंतर याचवर्षी (२०१०) जुलैमध्ये पाकिस्तान विरुद्व कसोटी पदार्पण केले. पण करिअर काही खास पुढे जात नव्हतं. कसोटी पदार्पणाच्या सामन्याआधी स्मिथ इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सहभागी झाला होता. त्याला बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्सनी (Royal Challengers Bangalore) विकत घेतले. पण त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. २०११ मध्ये स्मिथने फक्त एक कसोटी सामना खेळला होता. नंतर आयपीएलमध्ये त्याला कोची टस्कर्स केरळने (Kochi Tuskers Kerala ) विकत घेतले, परंतु पायाच्या ऑपरेशनमुळे तो खेळू शकला नाही.
२०१२ मध्ये स्मिथच्या कारकीर्दीचा टर्निंग पॉईंट आला. बर्याच वादानंतर पुणे वॉरियर्स इंडियाने (Pune Warriors India) आयपीएलमध्ये राहण्याचे मान्य केले. मागील मोसमातील आशिष नेहराच्या बदली म्हणून सौरव गांगुलीवर पुण्याने विश्वास दाखवत करार केला. २०१२ च्या हंगामातून बाहेर गेलेल्या कर्णधार युवराज सिंगच्या जागी सौरव गांगुलीला आपला कर्णधार म्हणून निवडले.
गमतीची गोष्ट म्हणजे आयपीएलच्या लिलावावर बहिष्कार टाकल्यानंतरही पुण्याने अनेक बड्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंची खरेदी केली. यात स्टीव्ह स्मिथ आणि मायकेल क्लार्क (Michael Clarke) सारख्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश होता. असे म्हटले जाते की चॅम्पियन्स लीग टी-20 सामन्यादरम्यान न्यू साउथ वेल्सकडून खेळणाऱ्या स्मिथकडे पाहून सौरव गांगुलीने त्याला विकत घेण्याची मागणी केली होती.
तोपर्यंत स्मिथ ऑस्ट्रेलियन संघात नियमित खेळाडू नव्हता. पण दादाचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. स्मिथही दादाच्या भरवशावर खरा उतरला. पण वास्तविक आश्चर्यकारक गोष्ट ५ मे २०१२ रोजी घडली. तो आयपीएल २०१२ चा ४७ वा सामना होता. कोलकाताने पुणे वॉरियर्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाताने पहिल्या १०षटकांत एकही बळी न गमावता ९८ धावा केल्या. १३ व्या षटकातील तिसर्या चेंडूवर मॅकलम आणि गंभीरच्या विकेटने ब्रेक लागला. अर्धशतक पूर्ण करून गंभीर माघारी परतला. तर ब्रेन्डन मॅकलम देखील पुढच्याच षटकात बाद झाला.
जेव्हा स्मिथने मारली उडी-
मुरली कार्तिक १५ वी ओवर घेऊन आला. पहिल्या तीन चेंडूंमध्ये फक्त दोन धावा आल्या. षटकातील चौथा चेंडू युसूफ पठाणने लॉन्ग-ऑनला मारला. हा फटका सीमारेषेबाहेर जाणार होता आणि गेलाही होता. पण ते सीमारेषेबाहेर पडला नाही. कारण लॉन्ग-ऑनवर क्षेत्ररक्षणासाठी असलेल्या स्मिथने त्याच्या उजवीकडे धाव घेतली आणि हवेत उडी मारली. कित्येक फूट उंचावर स्मिथनेही चेंडू पकडला. आणि त्याने चेंडू हाताने सीमारेषाआत फेकला. त्याने चार धावा वाचवल्या. कोणत्याही भारतीय क्रिकेट चाहत्याला विचारा, या कामगिरीनंतर स्मिथकडे पहिल्यांदा पहिलं गेलं होतं. ही एक विलक्षण गोष्ट होती. या घटनेनंतर अशा बर्याच गोष्टी घडल्या होत्या.
या आयपीएल दरम्यान जेव्हा दादाने सामन्यातून माघार घेतली तेव्हा त्याने स्मिथला कर्णधाराची जागा दिली. लक्षात घेण्यासारखी म्हणजे मायकेल क्लार्कसुद्धा या संघात होता आणि क्लार्क त्यावेळी पुण्याचा उप-कर्णधार होता, परंतु दादाने आपली जागा स्मिथला दिली. कारण दादाच्या सर्व वैशिष्ट्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या खेळाडूची प्रतिभा ओळखणे आणि नंतर त्याला संधी देणे. त्याने पुणे वॉरियर्सचे केवळ एका सामन्यातच नेतृत्त्व केले परंतु तो सामना दादामुळेच त्याला मिळाला होता.
स्मिथच्या कर्णधारपदाचा आणखी एक किस्सा असा कि. २०११-१२ मध्ये, बिग बॅश लीगचा पहिला हंगाम, तो सिडनी सिक्सर्स संघाचा कर्णधार पद सांभाळत होता. अनुभवी लेगस्पिनर स्टुअर्ट मॅकगिलने सामन्यादरम्यान आपल्या क्षेत्ररक्षणाबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याला उत्तर म्हणून स्मिथ म्हणाला, “हे बघ मित्र, मी कर्णधार आहे. मी जे सांगतो ते तुला करावं लागेल. आणि आता इथून जा आणि तेथे उभे रहा.”
स्वतःची ओळख निर्माण केली-
या आयपीएलमध्ये स्मिथने ३६२ धावा फटकावल्या. त्याच्या पुढच्याच वर्षी ऑस्ट्रेलियन संघ इंडिया टूरवर आला आणि या संघाने मालिकेच्या पहिल्या दोन कसोटी सामने गमावले. तिसर्या कसोटीत स्मिथला संधी मिळाली. मॅथ्यू वेड (Matthew Wade), शेन वॉटसन (Shane Watson), ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि जेम्स पॅटिनसन (James Pattinson) यांनी तिसर्या कसोटीपूर्वी अभ्यास केला नसल्याचे सांगितले गेले. यामुळे या चौघांना चौथ्या कसोटीमधून वगळण्यात आले. त्यांच्या जागी चार खेळाडूंना संधी देण्यात आली. त्या खेळाडूंमध्ये स्मिथचाही समावेश होता. या कसोटीच्या पहिल्या डावात स्मिथने ९२ धावा फटकावल्या. पण याच डावात मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) केलेली ९९ धावांची खेळी जास्त लक्षात राहिली. दुसर्या डावात स्मिथला केवळ ५ धावा करता आल्या आणि पुढच्या कसोटीतही त्याची कामगिरी काही खास नव्हती. ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० ने गमावली.
यानंतर स्मिथने इंग्लंड दौर्यावर ऑस्ट्रेलिया-अ संघाबरोबर उत्तम कामगिरी केली. वरिष्ठ संघात स्थान मिळवले आणि त्यानंतर सलग २ अॅशेस मालिका (Ashes series) खेळल्या. कारकिर्दीतील पहिल्या अॅशेस मालिकेत स्मिथने ३४५ धावा ठोकल्या.
२०१४ मध्ये फिलिप ह्यूजेस (Phillip Hughes) यांचे निधन झाले तेव्हा स्मिथ खूप अस्वस्थ झाला होता. जवळच्या मित्राला गमावल्यानंतर त्याला क्रिकेटच्या मैदानावर परत जावं असं त्याला वाटत नव्हतं. अशा परिस्थितीत त्याची मैत्रीण डॅनी विलिसने त्याला पुन्हा मैदानात आणले. तिने स्वत: गोलंदाजीची मशीन हाताळली आणि स्मिथला फलंदाजी करण्यास सांगितले. त्यानंतर, फलंदाजीच्या सरावावेळी तिने अनेक वेळा स्मिथसाठी बॉलिंग मशीन चालविली. पेशाने वकील आणि माजी जलतरण आणि वॉटर पोलो प्लेयर असलेल्या डॅनीने नंतर स्मिथशी लग्न केले.
२०१४-१५ मध्ये स्मिथने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत ७६९ धावा फटकावल्या. २०१५ मध्ये मायकेल क्लार्क निवृत्त झाल्यानंतर स्मिथ ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून निवडला गेला. स्मिथने तीन वर्षे ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. सन २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेदरम्यान “बॉल टेम्परिंग”चे प्रकरण समोर आले. यानंतर स्मिथवर १ वर्षासाठी बंदी घालण्यात आली. २०१९ च्या अॅशेस मालिकेदरम्यान त्याने ७७४ धावा फटकावून बंदीनंतर पुनरागमन केले. २०१९ विश्वचषकातही स्मिथने चांगला खेळ केला होता. त्याने या स्पर्धेत ३७.९० च्या सरासरीने ३७९ धावा केल्या.
लेगस्पिनर म्हणून ऑस्ट्रेलियन संघात सामील झालेला स्मिथ आज कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल दर्जाचा फलंदाज आहे. कसोटीत त्याची सरासरी ६२.८४ आहे, त्याची तुलना बर्याचदा डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांच्याशी केली जाते.