कोलकाता नाईट रायडर्सनं अलीकडेच आयपीएल 2024 चं विजेतेपद पटकावलं. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघानं अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. हे केकेआरचं तिसरं आयपीएल विजेतेपद आहे.
या सामन्यात कोलकाताच्या वेंकटेश अय्यरनं शानदार फलंदाजी केली होती. अय्यरनं 26 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. त्यानं आपल्या या खेळीत 4 चौकार आणि 3 षटकार लगावले होते. वेंकटेश अय्यरच्या या शानदार खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादवर सहज विजय मिळवला होता.
आता हा व्यंकटेश अय्यर लग्न बंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये व्यंकटेश अय्यर त्याच्या पत्नी सोबत दिसत आहे. या फोटोमध्ये दोघंही पारंपरिक लग्नाच्या कपड्यात दिसत आहेत. याशिवाय त्यांच्या आजुबाजूला लोकांची मोठी गर्दी जमली आहे. सोशल मीडियावर या कपल्सचे फोटो व्हायरल होत आहेत. युजर्स फोटोवर सातत्यानं कमेंट करून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
29 वर्षीय वेंकटेश अय्यरसाठी आयपीएल 2024 चा हंगाम उत्कृष्ट राहिला. या हंगामात त्यानं 4 वेळा 50 धावांचा टप्पा ओलांडला. याशिवाय त्यानं सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या अंतिम सामन्यात मॅच विनिंग खेळी खेळली होती. तो फलंदाजीशिवाय गोलंदाजीतही संघासाठी योगदान देऊ शकतो.
व्यंकटेश अय्यरच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर, या खेळाडूनं 2 एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त 9 टी20 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. याशिवाय त्यानं आयपीएलचे 50 सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये व्यंकटेश अय्यरनं 31.57 ची सरासरी आणि 137.13 च्या स्ट्राइक रेटनं 1326 धावा केल्या आहेत. व्यंकटेश अय्यरनं आयपीएलमध्ये आतापर्यंत 11 अर्धशतकं ठोकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
अमेरिका-कॅनडाचा क्रिकेट इतिहास आहे 180 वर्ष जुना! ‘या’ वर्षी खेळला गेला होता पहिला सामना
विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात लगावला 103 मीटरचा षटकार! मैदानावरील सर्वच थक्क; पाहा VIDEO
विराट सारखं दुसरं कोणीच नाही! टी20 विश्वचषकापूर्वी आयसीसीकडून मिळाला आणखी एक पुरस्कार