इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा ३८ वा सामना रविवारी (२६ सप्टेंबर) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला. या सामन्यात आपली विजयी घोडदौड कायम ठेवत प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी कोलकाताचा संघ सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसला. या सामन्यादरम्यान कोलकाता संघाच्या एका व्हिडिओची मात्र भरपूर चर्चा झाली.
या व्हिडिओत डगआऊटमधून कोलकाताच्या सपोर्ट स्टाफमधील एक सदस्य, मैदानावर असलेल्या कर्णधार इयॉन मॉर्गनला ‘कोड वर्ड्स’मध्ये सामन्याची स्थिती सांगताना कैद झाला आहे. परंतु हा व्हिडिओ चेन्नईविरुद्धच्या सामन्यातील नसून कोलकाताच्या मागील मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातील आहे.
गुरुवार रोजी (२३ सप्टेंबर) कोलकाता विरुद्ध मुंबई यांच्यात अबु धाबीच्या मैदानावरच हंगामातील ३४ वा सामना झाला होता. या सामन्यादरम्यान कोलकाता संघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम हे संघाच्या प्रदर्शनाविषयी बोलत होते. यावेळी त्यांच्या मागे कोलकाता संघातील इतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यही कॅमेरात दिसत होते. यावेळी कोलकाता संघाचे सामरिक सल्लागार (strategic consultant) नाथन लीमन हातात ४ अंक असलेला एक बोर्ड घेतात आणि तो आपल्या लॅपटॉपपुढे उभा करुन ठेवतात.
त्या बोर्डवरील तो अंक इतक्या मोठ्या अक्षरात लिहिलेला आहे की, तो दुरूनही स्पष्टपणे दिसू शकतो. यावरुन लीमन हे कर्णधार मॉर्गनला कोड वर्डमध्ये गोलंदाजीत बदल करण्यासाठी काही टिप्स देत असल्याचा अंदाज आहे. त्यांच्या या कृतीवर नेटकरी सोशल मीडियाद्वारे भरपूर टीका करत आहेत.
— No caption needed (@jabjabavas) September 23, 2021
महत्त्वाचे म्हणजे, कोलकाता संघाने अशा रणनितीचा अवलंब करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यातच अशी कृती केल्याचे समोर आले होते. त्याने बऱ्याचशा माजी क्रिकेटपटूंनी त्यांच्या या कोड वर्ड रणनितीवर टीका केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
एका नो बॉलमुळे ट्रोल झालेल्या झुलनची टीकाकारांना चपराक, ६०० विकेट्स पूर्ण करत रचला ‘इतिहास’