---Advertisement---

कोलकाता नाइट रायडर्सच्या संघातील या खेळाडूची पत्नी आहे इंटीरीअर डिझायनर; पुस्तक वाचनाचीही आहे आवड

On: गुरूवार, ऑगस्ट 27, 2020 6:45 PM
---Advertisement---

मुंबई । कोलकाता नाइट रायडर्सच्या स्फोटक फलंदाजांपैकी एक असलेल्या नितीश राणाने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्याची मैत्रीण सांची मारवारशी लग्न केले. मागील हंगामात नितीशने 14 सामन्यांत 146.38 च्या स्ट्राइक रेटने 344 धावा केल्या. तो स्वतः संघाचा महत्त्वाचा फलंदाज आहे. पण त्याची पत्नी विराट कोहली मोठी फॅन आहे.

7 डिसेंबर 1991 रोजी नवी दिल्ली येथे जन्मलेली सांची पेशाने एक इंटिरियर डिझायनर असून, पदवीच्या काळात सुप्रसिद्ध ठिकाणी तिने इंटर्नशिप केली आहे. 2016 मध्ये तीने नवी दिल्ली येथे आपला इंटिरियर डिझाईन स्टुडिओही सुरु केला होता. सांची विराट कोहली आणि गौतम गंभीर या क्रिकेटपटूंची आणि ज्लाटन इब्राहिमोविच या फुटबॉलपटूची चाहती आहे.

https://www.instagram.com/p/B6yHTnVBaYk/

इंटीरियर डिझायनिंगमध्ये वेगळी ओळख निर्माण करणार्‍या सांचीलाही प्रवास करायला आवडते. त्याच बरोबर, त्यांना पुस्तके वाचण्याची देखील आवड आहे.

नितीश राणाच्याविषयी बोलायचे झाल्यास केकेआरने या स्फोटक फलंदाजासाठी 2019 च्या आयपीएलसाठी 3 कोटी 40 लाख रुपये खर्च केले होते. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 46 सामने खेळले असून 29.32 च्या सरासरीने 8 अर्धशतकांसह 1085 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

निवृत्तीनंतर सुरेश रैना करणार हे काम ; जम्मू-काश्मीरच्या डीजीपींना लिहिले पत्र

व्हिडिओ: पाकिस्तानच्या खेळाडूने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर उगारली बॅट

द्विशतक ठोकणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजाने आयसीसी क्रमवारीत घेतली मोठी झेप; पहा विराट कोहली कोणत्या स्थानी

ट्रेंडिंग लेख –

कसोटी डावात ५० चौकारांचा पाऊस पाडणारा जगातील एकमेव अवलिया, आजही आहे विक्रम अबाधित

८ तासांत कसोटीत त्रिशतक करणारे जगातील एकमेव फलंदाज, ४६ चौकारांचा दिला गोलंदाजांना प्रसाद

मॅगी खायलाही एकवेळ तरसणारा क्रिकेटर आज आहे मुंबई इंडियनच्या टॉप प्लेअर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---