जगभरातील सर्वोत्तम टी20 लीगमध्ये गणल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग 2023मध्ये अनेक खेळाडूंनी पदार्पण केले. यामध्ये काही खेळाडू भारतातील आहेत, तर काही परदेशी आहेत. यात अफगाणिस्तानचा विस्फोटक फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज याचाही समावेश आहे. गुरबाजने पदार्पणातच आयपीएल 2023च्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात आपल्या फलंदाजीने छाप सोडली आहे. त्याने खेळीदरम्यान पंजाबविरुद्ध 1 खणखणीत षटकार ठोकला. त्याने हा षटकार आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू सॅम करन याच्या गोलंदाजीवर मारला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
झाले असे की, कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी रहमानुल्लाह गुरबाज (Rahmanullah Gurbaz) सलामीला उतरला होता. त्याला यावेळी फार मोठी खेळी साकारता आली नाही. मात्र, त्याने छोटेखानी खेळी करत मोठा पराक्रम गाजवला. त्याने यादरम्यान 16 चेंडूत 22 धावा केल्या. यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. गुरबाजने यावेळी एकच षटकार असा मारला की, चेंडूने 100 हून अधिक मीटरचे अंतर पार केले.
विशेष म्हणजे, गुरबाजने डावाच्या पहिल्याच षटकात पंजाबच्या 18.50 कोटी रुपयांचा खेळाडू सॅम करन (Sam Curran) याला एक खणखणीत षटकार आणि चौकार मारला. गुरबाजचा षटकार हा षटकातील पाचव्या चेंडूवर पाहायला मिळाला. करनने ताशी 124.2 मीटर गतीने फेकलेल्या या चेंडूवर गुरबाजने गगनचुंबी षटकार मारला. यावेळी चेंडू थेट 101 मीटर (Rahmanullah Gurbaz 101Meter six) दूर जाऊन पडला. यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
Gurbaz smashed first 101 meter six in IPL 2022. pic.twitter.com/XhPg3Hk60e
— Ran_zan_ (@Ranjan15102004) April 1, 2023
Rahmanullah Gurbaz on debut smashed a six off the 2nd ball against the most expensive player of IPL 2023.
A 101M monster by Gurbaz!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 1, 2023
Finally it is time for an Afghan batter to make his mark in the IPL. Rahmanullah Gurbaz is one of a kind. Pure matchwinner.
— Sreshth Shah (@sreshthx) April 1, 2023
https://twitter.com/nonedible_muffy/status/1642141996566605825?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1642141996566605825%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=about%3Asrcdoc
खरं तर, गुरबाज यावेळी 22 चेंडूवर बाद झाला. त्याला नेथन एलिस याने पॉवरप्लेच्या पाचव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्रिफळाचीत केले. गुरबाज चांगल्या लयीत खेळत होता. तो आणखी थोडा वेळ मैदानावर टिकला असता, तर त्याने पदार्पणातील अर्धशतक पूर्ण केले असते. मात्र, तसे घडले नाही. यष्टीरक्षक फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज याला कोलकाताने 50 लाख रुपयांमध्ये ताफ्यात सामील केले होते.
गुरबाजची कामगिरी
गुरबाज हा अफगाणिस्तानच्या सर्वात यशस्वी टी20 खेळाडूंपैकी एक आहे. त्याने 41 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 24.85च्या सरासरीने 134.25च्या स्ट्राईक रेटने एकूण 1019 धावा केल्या आहेत. तसेच, वनडेत त्याने 15 सामन्यात 582 धावा केल्या आहेत. अशात तो कोलकाताला त्याच्याकडून खूपच अपेक्षा असतील. (kkr batsman rahmanullah gurbaz smashed 101m six against sam curran see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
खेळाडूंपाठोपाठ कोच लक्ष्मणही महाकालेश्वराच्या पायाशी! सहकुटुंब घेतले दर्शन,छायाचित्रे व्हायरल
टॉस जिंकत दिल्लीचा बॉलिंगचा निर्णय, रिषभ पंतच्या अनुपस्थितीत वॉर्नर लढवणार किल्ला