कोलकाता नाईट रायडर्सनं आयपीएल 2024 चं विजेतेपद पटकावलं आहे. संघ यंदा तिसऱ्यांदा चॅम्पियन बनला. यावर्षी संघाचा माजी कर्णधार गौतम गंभीर केकेआरमध्ये मेंटॉर म्हणून परतला होता, ज्याचा त्यांना खूप फायदा झाला आहे. गेल्या हंगामात गंभीर लखनऊ सुपर जायंट्ससोबत होता. आता तो केकेआरमध्ये येताच संघ चॅम्पियन बनला. यामुळे गंभीरचं सर्वत्र खूप कौतुक होत आहे. मात्र केकेआरला चॅम्पियन बनवण्यात गंभीरसह आणखी एका व्यक्तीची महत्त्वाची भूमिका राहिली. हा व्यक्ती म्हणजे संघाचा फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर.
आयपीएल 2024 दरम्यान अभिषेक नायरबद्दल फार कमी चर्चा झाली. परंतु केकेआरसाठी पडद्यामागे राहून त्यानं खूप काही केलं. नायर हा संघाचा फलंदाजी प्रशिक्षक असून तो या हंगामात केकेआरमध्ये सामिल झाला होता. अभिषेकनं या हंगामात अनेक फलंदाजांसोबत काम करून त्यांच्यात सुधारणा घडवून आणली आहे. केकेआरचा खेळाडू वरुण चक्रवर्तीनं सामन्यानंतर अभिषेक नायरचा उल्लेख केला आणि त्याला खेळाडूंना तयार करण्याचं श्रेयही दिलं.
कोलकाताचा डावखुरा फलंदाज व्यंकटेश अय्यरनं आयपीएल 2024 मध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. त्यानं 14 सामन्यात 370 धावा केल्या. या कालावधीत त्यानं 4 अर्धशतकंही झळकावली. फायनल सामन्यानंतर व्यंकटेशनं त्याच्या फलंदाजीतील सुधारणेचं श्रेय अभिषेक नायरला दिलं. व्यंकटेशसोबत इतर खेळाडूंनीही नायरकडून प्रशिक्षण घेतलं आहे.
अभिषेक नायरचं यापूर्वीही खूप कौतुक झाले आहे. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि आरसीबीचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यांनीही नायरसोबत त्यांच्या फलंदाजीवर काम केलं आहे. या खेळाडूंनी नायरला याचं श्रेय फार पूर्वीच दिलं होतं.
आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट राडर्सनं खेळाच्या प्रत्येक विभागात चांगली कामगिरी केली. केकेआरची फलंदाजीसोबतच गोलंदाजीही दमदार होती. संघासाठी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हर्षित राणा आणि वैभव अरोरा यांच्यासारख्या नवोदित गोलंदाजांच्या चेंडूंनी अनेक दिग्गज खेळाडू त्रस्त झाले होते. अरुण यांनी या दोन्ही खेळाडूंसोबत खूप जवळून काम केलं. वैभवनं आयपीएल 2024 मध्ये 11 तर हर्षितनं 19 विकेट घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाचा ‘गब्बर’ दिसणार बिग बॉस मध्ये? वैवाहिक जीवन आहे खूप वादळी
शाहरुख खाननं रिंकू सिंहसोबत केली मस्ती, घट्ट मिठी मारून बोलला ‘हे’ दोन शब्द
आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक चौकार अन् षटकार मारणारे टॉप 5 खेळाडू, जाणून घ्या