इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२२) पंधराव्या हंगामातील आठव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्स संघाचा ६ गडी राखून पराभव केला. त्यांचा हा तीन सामन्यातील दुसरा विजय ठरला. अष्टपैलू आंध्र असेल कोलकात्याच्या विजयाचा शिल्पकार ठरला. कोलकाताने या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
ANDRE RUSSELL. That's it. That's the tweet. 😍#AndreRussell #KKRHaiTaiyaar #KKRvPBKS #IPL2022 pic.twitter.com/nNOcYYhyrR
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 1, 2022
उमेशची भेदक गोलंदाजी
कोलकाता कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय वेगवान गोलंदाज उमेश यादवने सार्थ ठरवला. त्याने पहिल्याच षटकात विरोधी कर्णधार मयंक अगरवाल याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर टीम साऊदी व शिवम मावी यांनी प्रत्येकी एक बळी घेत पावर प्लेमध्ये पंजाबचे तीन गडी गारद केले.
मधल्या फळीतील लियाम लिव्हिंगस्टोन व शाहरुख खान हे फारशी चमक दाखवू शकले नाही. हंगामातील आपला पहिला सामना खेळणारा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने २५ धावा करत पंजाबला १३७ अशी आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. कोलकातासाठी उमेश यादवने सर्वाधिक ४ बळी टिपले.
रसेलचे झंझावाती अर्धशतक
पंजाबकडून मिळालेले १३८ धावांचे आव्हान पूर्ण करताना, कोलकाताची सुरुवात खराब झाली. त्यांचे दोन्ही सलामीवीर ३८ धावांमध्ये माघारी परतले. त्यानंतर राहुल चहरने एकाच षटकात दोन बळी घेत कोलकाताची अवस्था ४ बाद ५१ केली. त्यानंतर मात्र केवळ आंद्रे रसेल शो दिसला. त्याने ८ षटकारांचा पाऊस पडताना ३१ चेंडूंमध्ये नाबाद ७० धावा कुटल्या. त्याला सॅम बिलिंग्सने २४ धावा काढून साथ दिली. कोलकाताने केवळ १४.३ सटका मध्ये आव्हान पूर्ण केले. या विजयासह कोलकाता गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे.
महत्वाच्या बातम्या-
अवघ्या ९ बॉलमध्ये भानुकाने आणला बवंडर! पाहा झंझावाती खेळीचा व्हिडिओ (mahasports.in)