यंदाच्या आयपीएल सत्रातील दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार रिषभ पंतने आपल्या तुफानी फलंदाजीने जगभरात ख्याती मिळविली आहे. ज्याप्रकारे तो निडर शैलीत खेळतो ते पाहून प्रेक्षकांना खूप आनंद मिळतो. परंतु गोलंदाजांच्या मात्र नाकी नऊ येते. गेल्या सहा महिन्यांत तो एका वेगळ्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलिया दौर्यापासून आतापर्यंत त्याने गोलंदाजांची पळता भुई थोडी केली आहे.
यानंतर आता आयपीएल 2021 मध्येही पंत दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. तत्पूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने पंतच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाज जोशुआ लालोर याच्याशी एका कार्यक्रमात संवाद साधताना जगातील एक नंबर गोलंदाज म्हटला जाणाऱ्या पॅट कमिन्सने हे भाष्य केले.
आयपीएल लीगमध्ये पॅट कमिन्स आणि रिषभ षभ पंत हे दोघे दिल्ली संघाकडून एकत्र खेळले असून त्यानंतर कसोटी मालिकेतही या दोघांची समोरासमोर भेट झाली होती. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या मालिकेत पंतने कांगारू गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले होते.
जेव्हा लालोरने कमिन्सला सध्या कोणत्या क्रिकेटपटूची खेळी पाहताना सर्वाधिक आनंद होतो? असे विचारले असता; यावर त्याने उत्तर दिले की, “असे खूप क्रिकेटपटू आहेत, परंतु गेल्या काही महिन्यांपासून पंत ज्याप्रकारे खेळत आहे. ते पाहून त्याने क्रिकेटला एक वेगळे वळण दिले असून त्याच्यासारखे कोणीच खेळताना दिसत नाही.”
तसेच तो म्हणाला की, “एक चाहता म्हणून, पंतला इतर खेळाडूंपेक्षा वेगळी खेळी करताना पाहून आपल्याला आनंद वाटतो. जेव्हा तुम्ही त्याला खेळताना पाहता तेव्हा मी सुद्धा या प्रकारची खेळी करावी असे वाटते. तो खूप निडर असून धैर्यवान देखील आहे. जेव्हा कोणी या प्रकारची खेळी करतो तेव्हा आपल्याला त्याला शाबासकी द्यावीच लागते. 50 खेळाडू एकत्र मिळूनही त्याच्यासारखी खेळी करू शकत नाहीत. म्हणून नेहमीच त्याला खेळताना पाहून मला आनंद होतो.”
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न कसोटी सामन्यातून पंत भारतीय संघात परतला होता. यानंतर त्याने सिडनी आणि ब्रिस्बेन कसोटीत आश्चर्यकारक अशी फलंदाजी केली होती. या कसोटी मालिकेमध्ये त्याने दमदार कामगिरी करत भारताला कसोटी मालिका 2-1 ने जिंकण्यास महत्त्वपुर्ण योगदान दिले होते. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी, टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतही त्याने इंग्लडच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. कसोटी मालिकेत त्याने अहमदाबादमधील शेवटच्या सामन्यात शतक झळकावले. आणि त्यानंतर एकदिवसीय सामन्यांमध्ये दोनदा 70 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! चेन्नई सुपर किंग्जला मिळाला जोश हेजलवुडचा पर्याय, ‘या’ खेळाडूला केले ताफ्यात सामील
अरे व्वा! केवळ हिंदी, मराठी नव्हे तर ‘या’ ८ भाषांमध्ये ऐकायला मिळणार आयपीएल सामन्यांचा थरार