इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ओली रॉबिन्सनला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. हा सामना त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील पहिला आणि शेवटचा सामना ठरला आहे. त्याने केलेले जुने वर्णद्वेषी ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी)ने त्याला निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच इंडियन प्रीमियर लीगच्या कोलकाता नाईट रायडर्स संघातर्फे ओएन मॉर्गन, जोस बटलर आणि ब्रेंडन मॅक्यूलम यांच्यावर वर्णद्वेषी टीका केल्यामुळे कारवाई करण्यात येऊ शकते.
माध्यमांतील वृत्तांनुसार, इंग्लंड संघ आणि आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करणाऱ्या ओएन मॉर्गन आणि राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर यांनी भारतीय चाहत्यांची खिल्ली उडवली होती. या दोन्ही खेळाडूंना खिल्ली उडवण्यात, कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्यूलम याने देखील साथ दिली होती. यामुळेच त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाने स्पष्ट केले आहे की, “आता आमच्याकडे या प्रकरणात कारवाई करण्यासाठी अधिक माहिती उपलब्ध नाहीये. कुठलेही कठोर पाऊल उचलण्यापूर्वी आम्हाला पूर्ण प्रकरणाची चौकशी करावी लागणार आहे. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, कुठलेही वर्णद्वेषी भाष्य सहन केले जाणार नाही.”
ईसीबी करणार कारवाई
ओली रॉबिन्सनला निलंबित केल्यानंतर ईसीबीने जोस बटलर आणि ओएन मॉर्गन यांच्या प्रकरणाबाबत देखील चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ईसीबीने म्हटले की, “ज्या खेळाडूंनी सोशल मीडियावर वर्णद्वेषी ट्विट केले आहे. त्या सर्वांची चौकशी केली जाणार आहे. आमच्याकडे कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषी आढळलेल्या खेळाडूंवर योग्य ती कारवाई केली जाईल.”
याबाबत बीसीसीआयने कुठलीही प्रतिक्रिया दिली नाहीये. तसेच जोस बटलर आणि ओएन मॉर्गन यांनी देखील या प्रकरणात आपले मत मांडले नाहीये.
महत्त्वाच्या बातम्या-
केकेआरच्या कमिन्सची वेगळीच गंमत, पहिल्या भेटीत ‘किंग खान’ शाहरुखला ओळखलेसुद्धा नव्हते
‘काय मनमोहक उन्हाळा आहे’; अनुष्का इंग्लंडच्या वातावरणाचा लुटतेय आनंद, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात