---Advertisement---

राणाचा राग कमी होईना! खेळाडूंनंतर आता थेट पंचांशीच घातली हुज्जत, सीएसकेविरूद्ध घडली ‘ही’ घटना

---Advertisement---

रविवारी (दि. 14 मे) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर आयपीएल 2023 स्पर्धेचा 61वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. या सामन्यात कोलकाता संघाने चेन्नईला 6 गडी राखून पराभूत केले. चेन्नईचा आपल्या घरच्या मैदानावरील हा हंगामातील अखेरचा सामना होता. या सामन्यात विजय मिळाला असला तरी, केकेआरचा कर्णधार नितिश राणा याने या सामन्यात पंचांशी हुज्जत घातली.

या सामन्यात चेन्नई संघ प्रथम फलंदाजी करताना राणा व पंच यांच्यात काहीसा शाब्दिक वाद झाला. चेन्नईच्या डावातील 19 वे षटक सुरू असताना पंचांनी एक चेंडू वाईड दिला. त्यावर राणाने कोणताही रिव्ह्यू घेतला नाही. मात्र, पंचांना वाटले त्याने रिव्ह्यू मागितला आहे म्हणून ते तिसऱ्या पंचांकडे गेले. त्यावर राणाने आक्षेप घेत आपण मागणी केली नसल्याचे सांगितले.

हे षटक समाप्त होत असतानाच पंचांनी संथ गतीने षटके टाकल्यामुळे एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये आणण्यास सांगितले. त्यावेळी राणाने तुमची चूक असल्यामुळे असे प्रकार घडत आहेत असे सुनावले. तुम्ही रिव्ह्यू घेतला नसता तर ही वेळ आली नसती, असे त्याचे म्हणणे होते. मात्र, अखेरीस त्याला पंचांचा निर्णय मान्य करावा लागला.

यापूर्वी हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात त्याचा ऋतिक शौकीन याच्याशी मोठा वाद झाला होता. त्यानंतर त्याच्या सामना शुल्काची कपात केली गेलेली. तसेच यापूर्वी देखील षटकांची गती संथ राखल्याने त्याला दंड ठरवण्यात आला होता. केकेआरचा आता स्पर्धेतील केवळ एक सामना शिल्लक असून, प्ले ऑफमध्ये जाण्याची त्यांची संधी हुकली आहे.

(KKR Captain Nitish Rana Involved In Verbal Spat With Umpires Match Between CSK)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
विराटकडून युवा जयसवालला गुरुमंत्र! सामन्यानंतर खास टिप्स देताना दिसला ‘किंग’, पाहा व्हिडिओ
हा तर RCBचा धोनी! भावाने स्टंप्सकडे न पाहताच अश्विनला केले यष्टीचीत, ‘नो लूक’ Runout व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---