सौरव गांगुलीच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआय आयपीएल २०२० आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मोकळ्या स्टेडियममध्ये ही स्पर्धा घेण्याचे योजना सुरू असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, एक मोठी बातमी अशी आहे, की शाहरुख खानचा संघ कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) बीसीसीआयला इशारा दिला आहे.
कोलकाता नाइट रायडर्सचे (Kolkata Knight Riders) मुख्य कार्यकारी वेंकी म्हैसूर (Venky Mysore) यांचे म्हणणे आहे, की आयपीएलमधील कोणत्याही स्वरुपात कोणत्याही प्रकारची छेडछाड मान्य केली जाणार नाही. म्हैसूरने गुरुवारी (११ जून) दावा केला आहे, की सर्व फ्रंचायझींचं म्हणनं आहे की ही मालिका पूर्ण प्रकारात आयोजित केली जावी.
कोविड-१९मुळे मार्च महिन्यात झालेल्या लॉकडाऊनमुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. यावर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण टी२० विश्वचषकविषयक अनिश्चिततेमुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विंडो तयार होण्याची शक्यता आहे.
म्हैसूर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले, “मला एक गोष्ट वाटते आणि त्याबद्दल आम्ही खूप ठाम आहोत, की आपण आयपीएल स्वरुपात छेडछाड करू नये. त्याचे स्वरूप खूप खास आहे. मला वाटते, प्रत्येकाचे मत आहे की आपण ही स्पर्धा पूर्ण स्वरुपात आयोजित केली पाहिजे. यात संपूर्ण सामन्यांची संख्या असणे आवश्यक आहे आणि सर्व खेळाडूंनी यात भाग घेतला पाहिजे.”
परदेशी खेळाडूंविना आयपीएल आयोजित केले जाऊ शकते. कारण बर्याच देशांनी प्रवासाशी संबंधित निर्बंध लादले आहेत. त्यामुळे सामन्यांची संख्या कमी केली पाहिजे. जेणेकरून ती लहान विंडोमध्ये पूर्ण होईल, असेही म्हटले जात आहे.