आयपीएल 2020 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या (केकेआर) कर्णधारपदाला राजीनामा देण्याबाबत यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने मोठा खुलासा केला आहे. त्याला हा निर्णय का घ्यावा लागला होता? याबाबत त्याने सांगितले आहे. केकेआरने याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये त्याने मॉर्गनला संधी द्यायची होती, म्हणून कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे.
केकेआरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला की, “मला मॉर्गनला संधी द्यायची होती. कारण ते खरोखरच महत्वाचे होते आणि त्यावेळी माझ्या नेतृत्वात संघाने 7 सामने खेळले होते, अजूनही तेवढेच सामने खेळणे बाकी होते. माझ्या मते संघ वाईट स्थितीत असताना जर मी राजीनामा दिला असता तर माझ्यावरती टीका झाली असती. त्यामुळे हीच योग्य वेळे आहे विचार करून मी हा निर्णय घेतला.”
पुढे तो म्हणाला की, “मी अडीच वर्ष संघाचे नेतृत्व केले असून त्यामध्ये मी खेळाडूंचा आत्मविश्वास जिंकला केला. मला वाटते की कर्णधार म्हणून ते खूप महत्वाचे आहे. तसेच दोघांनीही संघाला स्वत:पेक्षा जास्त महत्त्व दिले आहे, असा खेळाडूंला विश्वास होता म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला होता.”
सध्या आयपीएल 2021 मध्ये दिनेश कार्तिक केकेआर संघाचा एक महत्त्वाचा भाग असून या संघामध्ये फलंदाजीबरोबरच तो यष्टीरक्षकणही करत आहे. मागील मोसमात संघ मालकाचा त्याच्यावरती दबाव असल्यामुळे त्याने कर्णधारपद सोडल्याचे सांगितले जात होते. परंतु आता दिनेश कार्तिकने या चर्चांवर पूर्णविराम लावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-