---Advertisement---

सामना जिंकण्याआधीच केकेआर प्ले आॅफला पात्र!

On: शनिवार, मे 19, 2018 11:35 PM
---Advertisement---

हैद्राबाद । आयपील २०१८मध्ये प्ले आॅफला पात्र झालेला कोलकाता नाईट रायडर्स तिसरा संघ ठरला आहे. जिंकण्यासाठी हैद्राबादने त्यांच्यासमोर २० षटकांत १७३ धावांचे लक्ष ठेवण्यात आले होते तर राजस्थानपेक्षा चांगल्या नेट रनरेटसाठी त्यांना आज केवळ १२९ धावांची गरज होती.

याच कारणामुळे ते आता प्ले आॅफला पात्र ठरले आहे.

यामुळे आता राजस्थानच्या संपुर्ण आशा आता उद्या मुंबई आणि दिल्ली यांच्यात होणाऱ्या सामन्यावर अवलंबुन आहेत.

जर उद्या मुंबई पराभूत झाली तर पंजाबपेक्षा चांगला नेट रनरेट असल्यामुळे राजस्थान प्ले आॅफला पात्र ठरणार आहेत.

यामुळे आता क्वाॅलिफायर १चा सामना हैद्राबाद विरुद्ध चेन्नई तर इलिमीनेटर१ चा सामना कोलकाता विरुद्ध मुंबई किंवा राजस्थान असा होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment