अबू धाबी नाईट रायडर्सने (एडीकेआर) युएई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टी-२० लीगसाठी त्यांचा संघ जाहीर केला आहे. एडीकेआरने मंगळवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून याची घोषणा केली. यासोबतच नाइट रायडर्सचे सीईओ वेंकी मैसूर यांनीही एक निवेदन जारी केले आहे. या लीगचा पहिला हंगाम पुढील वर्षीच्या सुरुवातीला खेळवला जाईल.
🚨 #ADKR Squad Announcement:
Meet the Knights for the inaugural #ILT20 season 👋#KnightRiders@ILT20Official @EmiratesCricket pic.twitter.com/rOdAub8LYJ— Abu Dhabi Knight Riders (@ADKRiders) August 16, 2022
कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल आणि सुनील नरेन यांचाही या १४ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. यासह इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो संघाचा यष्टिरक्षक असेल. शिवाय आयर्लंडचा महान खेळाडू पॉल स्टर्लिंगचाही समावेश झाला आहे.
एडीकेआर संघातील काही खेळाडू:
सुनील नरेन, आंद्रे रसेल, जॉनी बेअरस्टो, पॉल स्टर्लिंग, लाहिरू कुमारा, चारिथ अस्लंका, कॉलिन इंग्राम, अकिल होसेन, सिक्कुगे प्रसन्ना, रवी रामपॉल, रेमन रेफर, केनर लुईस, अली खान, ब्रँडन ग्लोव्हर
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा