आयपीएलच्या तेराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) हा संघ स्टार खेळाडूंनी भरला आहे. दिनेश कार्तिकच्या नेतृत्त्वाखाली संघाला तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी पटकावण्याची आशा आहे. गतवर्षीच्या आयपीएल हंगामात केकेआर संघ हवी तशी कामगिरी करु शकला नव्हता. गौतम गंभीरच्या नेतृत्त्वाखाली केकेआरने २ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली खरी, पण त्याच्या जाण्याने संघात खूप बदल झाले होते.
यंदाच्या केकेआर संघाचे प्रदर्शन फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीवरही टिकून आहे. जर या दोन्ही विभागांपैकी एकाही विभागात संघाने खराब प्रदर्शन केले, तर संघाला मोठे नुकसान झेलावे लागू शकते. केकेआरने गतवर्षी झालेल्या आयपीएल लिलावात ३ मोठ्या खेळाडूंना संघातून बाहेर केले आहे. त्या खेळाडूंनी संघाच्या अनेक विजयात महत्त्वपुर्ण भूमिका निभावली होती. लिलावादरम्यान या खेळाडूंना ट्रेड करत इतर संघांनी आपल्या संघात सामाविष्ट करुन घेतले.
जर यावर्षी केकेआरने खराब प्रदर्शन केले, तर त्यांना संघातील ३ दमदार खेळाडूंना बाहेर केल्याचा खूप पश्चाताप होऊ शकतो. तर कोण आहेत, ते खेळाडू ज्यांच्या जाण्याने केकेआरला मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊयात…
तीन दिग्गज खेळाडू, जे यावर्षी नाहीत केकेआरचे भाग (KKR May Have Regret For Releasing These 3 Players This IPL) –
रॉबिन उथप्पा-
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रॉबिन उथप्पाने कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून ६ वर्षे क्रिकेट खेळले आहे. आयपीएल २०२०मध्ये तो राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. केकेआरकडून उथप्पाने ८६ सामने खेळत २४३९ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १६ अर्धशतकांचा आणि सर्वाधिक ८२ धावांचाही समावेश आहे.
२०१४ साली जेव्हा केकेआरने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते, तेव्हा उथप्पाला ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजासाठी) मिळाली होती. मात्र त्या हंगामानंतर उथप्पा चांगले प्रदर्शन करु शकला नाही. त्याला पुढील हंगामात ४०० धावांचा आकडाही पार करण्यात यश आले नाही. त्यामुळे या हंगामात तो आपल्या प्रदर्शनात सुधार आणत, उत्तमोत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करु शकतो.
ख्रिस लिन-
ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज ख्रिस लिन हा २०१४पासून केकेआर संघाचा भाग होता. त्याने केकेआरकडून सलामीवीर फलंदाजाची भूमिका निभावत ४० सामन्यात १२७४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १० अर्धशतकांचा समावेश आहे. सुनिल नरेनसोबत मिळून त्याने केकेआरला अनेक सामने जिंकून दिले आहेत.
मात्र, यंदा केकेआरने त्याला संघातून बाहेर केल्यामुळे तो मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. नेहमीप्रमाणे तो यावर्षीही आपल्या संघासाठी आपले उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करेल. मुंबई इंडियन्सला त्याच्याकडून दमदार प्रदर्शनाची अपेक्षा असणार आहे.
पीयूष चावला-
भारताचा गोलंदाज पियूष चावला हा २०१४पासून ते २०१९पर्यंत कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता. या हंगामात तो एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाकडून आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवताना दिसेल.
चावलाने केकेआरकडून ७० सामने खेळत २७.८०च्या सरासरीने ६६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचे केकेआरच्या घरेलू मैदान, ईडन गार्डन स्टेडियमवरचे प्रदर्शन दमदार राहिले आहे. मात्र, गतवर्षीच्या आयपीएल लिलावात केकेआरने त्याला संघातून बाहेर केल्यामुळे तो यंदा यूएईमध्ये सीएसकेकडून खेळताना दिसेल.
ट्रेंडिंग लेख –
-४ सज्जन भारतीय क्रिकेटर, ज्यांनी कधीही केले नाही दारुचे सेवन
-आज जागतिक वडापाव दिन, त्यानिमित्ताने पहा कोणत्या खेळाडूला काय आवडते?
-क्रिकेटपटू म्हणून नाव कमावूनही नेहमीच स्वत: ला एक शिक्षक मानणारा क्रिकेटर
महत्त्वाच्या बातम्या –
-विराट कोहलीचे आरसीबीचे कर्णधारपद जाणार?, संघ मालकाने दिली प्रतिक्रिया
-आयपीएलच्या तिसऱ्या हंगामात सचिनच्या संघावर ठरला होता धोनीचा संघ भारी