आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खान आज (२ नोव्हेंबर) आपला ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडपासून क्रिकेटच्या मैदानापर्यंत त्याच्या चाहत्यांची संख्या खूप जास्त आहे. चित्रपट सृष्टी सोबत शाहरुख खान क्रिकेटशीही जोडला गेला आहे. तो आयपीएलमधील केकेआर संघासह अनेक क्रीडा संघांचा सह-मालक आहे.
आयपीएलमधील आपल्या संघाचे मनोबल वाढवण्यासाठी तो प्रत्येक मोसमात स्टेडियममध्ये पोहोचतो, मात्र या मोसमात तो त्याच्या मुलाच्या प्रकरणामुळे स्टेडियमपर्यंत पोहोचू शकला नाही. असे असले तरी त्याच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. शाहरुख खानच्या वाढदिवसा निमित्ताने त्याला क्रीडा जगताशी संबंधित लोकांनी कशा प्रकारे शुभेच्छा दिल्या जाणून घेऊ या.
शाहरुख खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दिनेश कार्तिकने लिहिले की, ‘तुम्ही शाहरुखसाठी असंख्य विशेषणं वापरू शकता आणि तरीही तो एक व्यक्ती म्हणून किती दयाळू आणि काळजी घेणारा आहे, याचे वर्णन करण्यात कमी पडतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!’
You could use numerous adjectives and still fall short of describing how kind and caring he is as a person.
A very happy birthday to you @iamsrk, wishing you the best always! pic.twitter.com/4htB3G40fL— DK (@DineshKarthik) November 2, 2021
मुनाफ पटेलने ट्वीट करत लिहिले की, ‘किंग खानला खूप खूप शुभेच्छा, तुमचे स्वप्न पूर्ण होवो आणि पुढील निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.’
Best Wishes to king khan, wish your dream come true & healthy life ahead @iamsrk#HappyBirthdaySRK pic.twitter.com/EhQEMZGLKr
— Munaf Patel (@munafpa99881129) November 2, 2021
भारताचा स्टार बॉक्सिंगपटू विजेंद्र सिंगने शाहरुख खानला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने ट्वीट करत लिहिले की, ‘वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाई.’
Bhai @iamsrk happy birthday #HappyBirthdaySRK 🎉😊 pic.twitter.com/xLwfTkTzXQ
— Vijender Singh (@boxervijender) November 2, 2021
क्रीडाक्षेत्रातून अनेकांनी शाहरुखला शुभेच्छा दिल्या आहेत.
Warmest wishes to you on your special day, @iamsrk Sir. God bless you. 💜🤗 pic.twitter.com/6WSGvzftCj
— Kuldeep yadav (@imkuldeep18) November 2, 2021
Words can't describe these emotions! 😍
Happiest birthday to the one & only #ShahRukhKhan 💜💛#HappyBirthdaySRK #SRK #KKR #AmiKKR pic.twitter.com/1GpfCsky7H
— KolkataKnightRiders (@KKRiders) November 2, 2021
Happy birthday 🤴 @iamsrk https://t.co/X7qqsW0Q7B
— Rinku Singh (@rinkusingh235) November 1, 2021
बॉलिवूड अभिनेत्री आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने देखील इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर करून शाहरुख खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शाहरुख खान आणि अभिनेत्री जुहीन चावला आणि तिच्या पतीने २००८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी मालकी हक्क विकत घेतले होते. सुरुवातीच्या मोसमापासून शाहरुख आपल्या संघाचे मनोबल वाढवण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचत असतो. त्यांची मुलेही अनेकदा त्याच्यासोबत स्टेडियममध्ये पोहोचतात. सुरुवातीच्या काही हंगामात त्यांचा संघ अपयशी ठरला होता. पण शाहरुख खानमुळे केकेआर संघ नेहमीच चाहत्यांमध्ये लोकप्रिय राहिला.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ गाजवलेल्या ‘या’ ५ यंगस्टर्सकडे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये असेल सर्वांचेच लक्ष
आयपीएलच्या मेगा लिलावात श्रेयस अय्यरकडे असू शकते मोठी मागणी, ‘या’ संघांची असेल त्याच्यावर नजर
शमी आणि चक्रवर्तीची होणार सुट्टी? अफगानिस्तानविरुद्ध ‘या’ २ भारतीय गोलंदाजांची होऊ शकते एन्ट्री