कोलकाता नाईट रायडर्स हा आयपीएल 2024 च्या लीग टप्प्यातील सर्वोत्कृष्ट संघ होता. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ साखळी टप्प्यात सर्वाधिक 9 सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानी राहिला. आता क्वालिफायर 1 मध्ये केकेआरचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी केकेआरच्या खेळाडूंनी गुवाहाटीतील मंदिरात पोहचून आशीर्वाद घेतला.
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ रविवारी (19 मे) गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्सविरुद्ध हंगामातील शेवटचा साखळी सामना खेळणार होता. मात्र पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. सामना रद्द झाल्यानंतर सोमवारी सकाळी केकेआरचे अनेक खेळाडू गुवाहाटीतील ‘मां कामाख्या देवी’च्या मंदिरात पोहोचले. मंदिरात पोहोचलेल्या खेळाडूंमध्ये नितीश राणा, हर्षित राणा, रमणदीप सिंग आणि व्यंकटेश अय्यर यांचा समावेश होता.
Nitish Rana, Harshit Rana, Venkatesh Iyer, Suyash Sharma, Ramandeep Singh visited the Maa Kamakhya Temple. ❤️ pic.twitter.com/08ZEn7PL8k
— Johns. (@CricCrazyJohns) May 20, 2024
कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल 2024 चा पहिला क्वालिफायर सामना मंगळवार, 21 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. तर पराभूत संघाला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी असेल. पराभूत संघ क्वालिफायर 2 खेळून अंतिम फेरीत प्रवेश करू शकेल.
कोलकातानं साखळी टप्प्यातील सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय मिळवला होता. केकेआरनं 14 पैकी 9 लीग सामने जिंकले तर 3 सामन्यांमध्ये पराभव पत्कारलाय. याशिवाय संघाचे दोन सामने पावसामुळे वाहून गेले. केकेआरचा 13 मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध आणि 21 मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
तर सनरायझर्स हैदराबादचा संघ 14 सामन्यांत 8 विजय आणि 5 पराभवानंतर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी राहिला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
आरसीबीच्या विजयानंतर चिन्नास्वामीवर झाला रेकॉर्डब्रेक आवाज, धोनीची एंट्रीही ठरली फिकी!