---Advertisement---

भारताचा हा अष्टपैलू खेळाडू लवकरच ‘डॉक्टर’ बनणार! लिलावात मिळाली होती मोठी रक्कम

On: सोमवार, डिसेंबर 9, 2024 1:09 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 मेगा लिलावात कोलकाता नाइट रायडर्सनं व्यंकटेश अय्यरवर मोठी बोली लावली होती. केकेआरनं व्यंकटेशला तब्बल 23.75 कोटी रुपयांना विकत घेतलंय. तो संघाचा नवा कर्णधारही होऊ शकतो. दरम्यान, एक अनपेक्षित बातमी समोर आली आहे.

वास्तविक, व्यंकटेश अय्यरच्या नावासमोर लवकरच ‘डॉक्टर’ ही उपाधी लागणार आहे. अय्यरनं पीएचडीचा अभ्यास सुरू केला असून त्यानं खुद्द ही माहिती दिली. व्यंकटेशच्या मते, शिक्षण हे खूप महत्वाचं आहे आणि ते आयुष्याच्या शेवटपर्यंत चालू राहतं. नुकतीच त्यानं ‘इंडियन एक्सप्रेस’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्यानं सांगितलं की, तो पीएचडी करत आहे. अय्यर म्हणाला, “माझ्या शिक्षणामुळे मला मैदानावर निर्णय घेणं सोपं झालं आहे. मला वाटतं की क्रिकेटपटूंना फक्त क्रिकेटच नव्हे तर सामान्य ज्ञानही हवं. मी सध्या फायनन्स या विषयात पीएचडी करत आहे.”

व्यंकटेश अय्यर यानं लवकरच त्याच्या नावापुढे डॉक्टर ही उपाधी लागणार असल्याचं सांगितलं. व्यंकटेश हा क्रिकेटसोबतच अभ्यासातही चांगला असून तो अशा मोजक्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे, ज्यानं खेळासोबतच अभ्यासही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

व्यंकटेश अय्यर आयपीएल 2024 विजेत्या केकेआरचा भाग होता. मात्र नुकत्याच झालेल्या मेगा लिलावापूर्वी संघानं त्याला रिलिज केलं.  गेल्या हंगामापर्यंत व्यंकटेशचा पगार 8 कोटी रुपये होता. परंतु मेगा ऑक्शनमध्ये आल्यानंतर त्याला भरपूर फायदा झाला. व्यंकटेशला केकेआरनं तब्बल 23.75 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केलं. केकेआरसोबतच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनंही त्याच्यावर बोली लावली होती. आरसीबीनं अय्यरवर 23.50 कोटी रुपयांपर्यंतची शेवटची बोली लावली होती. अखेर केकेआरनं सर्वात मोठी बोली लावून बाजी मारली.

हेही वाचा – 

तिसऱ्या कसोटीपूर्वी संघाला धक्का! स्टार खेळाडू बाहेर, मालिका गमावण्याचा धोका?
बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारत कमबॅक कसा करू शकतो? हे 4 बदल करणे आवश्यक
“आता नाही तर कधी …” मोहम्मद शमीच्या पुनरागमनाच्या निर्णयाबाबत माजी क्रिकेटपटूने बीसीसीआयला सुनावले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---