कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला आयपीएलमध्ये स्लो ओव्हर रेटचा फटका बसला आहे. श्रेयस अय्यरला मंगळवारी (16 एप्रिल) राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेट साठी 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. त्याच्या आधी शुबमन गिल, ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना स्लो ओव्हर रेटचा दंड बसला आहे.
इंडियन प्रीमियर लीगनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, “आयपीएलच्या आचारसंहितेतील किमान ओव्हर रेट अंतर्गत हा त्याच्या संघाचा हंगामातील पहिला गुन्हा होता. त्यामुळे अय्यरला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.”
3 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीला 106 धावांनी मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं होते. त्या सामन्यात पंतच्या संघानं स्लो ओव्हर रेटनं गोलंदाजी केली होती. त्यामुळे ऋषभ पंतला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. तर दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग इलेव्हन मधील इतर सदस्यांना 6 लाख किंवा त्यांच्या मॅच फीच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल, तेवढा दंड ठोठावण्यात आला होता. पंतनं दोनदा आयपीएलच्या आचारसंहितेचं उल्लंघन केलं आहे. त्याला चेन्नईविरुद्धच्या सामन्यातही स्लो ओव्हर रेटमुळे 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.
10 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात गुजरातनं राजस्थानचा 3 गडी राखून पराभव केला. या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे संजू सॅमसनला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. शुबमन गिल हा आयपीएलच्या या हंगामातील पहिला कर्णधार होता, ज्याला स्लोओव्हर रेट अंतर्गत दंड ठोठावण्यात आला. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात गिलच्या संघानं निर्धारित वेळेत संपूर्ण षटकं पूर्ण केली नव्हती.
आयपीएलमध्ये पहिल्यांदाच स्लोओव्हर रेटमध्ये कोणी दोषी आढळल्यास त्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला जातो. दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास कर्णधाराला 24 लाख रुपये आणि संघातील सदस्यांना 6 लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या 25 टक्के, यापैकी जे कमी असेल तेवढा दंड ठोठावण्यात येतो. तिसऱ्यांदा दोषी आढळल्यास कर्णधारावर एका सामन्याची बंदी घालण्यात येते.
महत्त्वाच्या बातम्या –
दुखापतीमुळे संपली होती आंतरराष्ट्रीय कारकीर्द, आता या बॅडमिंटनपटू केली UPSC क्रॅक!
ट्रेंट बोल्टच्या एका यॉर्करनं लाखोंचं नुकसान! कोलकाताविरुद्धच्या सामन्यात असं काय घडलं?
मालक असावा तर असा! पराभवानंतर स्टेडियममध्ये भावूक झाला ‘किंग खान’, सामन्यादरम्यान दिसला वेगळाच अवतार