---Advertisement---

अथक प्रयत्नांना अखेर यश! १३ आयपीएल अर्धशतके करणाऱ्या धुरंधराचे भारतीय संघात होणार पदार्पण?

On: गुरूवार, जून 10, 2021 2:05 PM
---Advertisement---

येत्या जुलै महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात मर्यादित षटकांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यासाठी येत्या १५ किंवा १६ जूनला भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. या कालावधीत भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त असणार आहेत. त्यामुळे या दौऱ्यावर अनेक युवा खेळाडूंना भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळणार आहे.

भारतीय वरिष्ठ संघातील खेळाडूंना येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. हा सामना झाल्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेत आणि देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या संघात स्थान मिळू शकते.

गेल्या काही वर्षांपासून कोलकाता नाईट रायडर्स संघाचा फलंदाज, नितीश राणा देखील भारतीय संघात पदार्पण करण्याच्या प्रतिक्षेत आहे. त्याने गेल्या काही हंगामात आपल्या उल्लेखनीय कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. अशात या फलंदाजाला श्रीलंका दौऱ्यावर संधी मिळू शकते.

अशी आहे क्रिकेट कारकिर्द
नितीश राणाने आतापर्यंत एकूण ३८ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्याने ४१.२० च्या सरासरीने २२६६ धावा केल्या आहेत. यासोबतच ५८ लिस्ट ए सामन्यात त्याने ४१ पेक्षा अधिकच्या सरासरीने १९४० धावा केल्या आहेत. तसेच त्याने टी-२० क्रिकेटमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत एकूण १२२ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याला १३६.३६ च्या स्ट्राइक रेटने २८४६ धावा करण्यात यश आले आहे.

आयपीएल स्पर्धेतही उल्लेखनीय कामगिरी
नितीश राणाने २०१७ पासून प्रत्येक हंगामात ३०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. २०१७ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याला १३ सामन्यात ३३३ धावा करण्यात यश आले होते. तर २०१८ मध्ये त्याने ३०४ धावा केल्या होत्या. तसेच २०१९ मध्ये ३४४ आणि २०२० मध्ये त्याच्या बॅटमधून ३५२ धावा निघाल्या होत्या. इतकेच नव्हे तर त्याने आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी २०१ धावा केल्या होत्या. हा आकडा स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्ये पुढे जाऊ शकतो.

मैदानात आपल्या आक्रमक फलंदाजीमुळे प्रसिद्ध असलेला नितीश राणा मैदानाबाहेर आपल्या स्टाईल आणि लूक्ससाठी फेमस आहे. स्टाईल आणि लूक्सच्या बाबतीत तो विराट कोहली आणि हार्दिक पंड्यापेक्षा काही कमी नाहीये. २०१९ मध्ये त्याने त्याची प्रेयसी साची मारवाहसोबत विवाह केला होता. साचीबद्दल बोलायचं झालं तर ती एक फॅशन डिझायनर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बुमराह-शमीच्या गोलंदाजीची धार अन् विराट-रिषभचा प्रहार; सरावाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल

कट्टर विरोधक असलेल्या पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूची धर्मपत्नी आहे कोहलीची जबरदस्त चाहती

लग्नानंतर रोहित विसरला होता ‘ही’ महत्त्वाची गोष्ट, विराटने डंका पिटत सर्वांपुढे केलंत हसू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---