2025च्या आयपीएल (Indian Premier League) हंगामाची चाहत्यांना नक्कीच उत्सुकता लागली असेल. जागतिक क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय टी20 लीग (आयपीएल) मार्च महिन्यात सुरू होणार आहे. या मेगा टी20 लीगला सुरुवात होण्यासाठी अजून बरेच दिवस शिल्लक आहेत.
दरम्यान या मेगा स्पर्धेत भारताचा स्टार फिनिशर फलंदाज रिंकू सिंह (Rinku Singh) देखील एक आहे. आयपीएलच्या गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) या हंगामासाठी या युवा फलंदाजाला कायम ठेवले आहे. जिथे तो या संघातील सर्वात प्रमुख खेळाडूंपैकी एक असेल. रिंकूसाठी आयपीएल 2025 खूप खास ठरेल. कारण तो यामध्ये काही वैयक्तिक कामगिरीच्या जवळ आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊया.
1) रिंकू सिंह 50 षटकार पूर्ण करण्याच्या जवळ- भारतीय क्रिकेट संघाचा युवा स्टार फलंदाज रिंकू हा षटकार मारण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो. या आशादायक फलंदाजाने आयपीएलपासून ते भारतीय संघापर्यंत षटकार मारण्याच्या क्षमतेने सर्वांना प्रभावित केले आहे. रिंकू आयपीएल 2025 दरम्यान 50 षटकार पूर्ण करू शकते. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत एकूण 46 षटकार मारले आहेत. जर त्याने आणखी 4 षटकार मारले तर तो आयपीएलमध्ये 50 षटकार पूर्ण करेल.
2) रिंकू सिंह 50 आयपीएल सामने पूर्ण करणार- केकेआरचा स्टार फलंदाज रिंकू सिंह (Rinku Singh) गेल्या काही हंगामांपासून या संघाकडून खेळत आहे. उत्तर प्रदेशातील या डावखुऱ्या फलंदाजाने 2018 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून आतापर्यंत त्याने 45 सामने खेळले आहेत. आयपीएलच्या 18व्या हंगामात त्याचा 5वा सामना खेळून तो 50 आयपीएल सामन्यांचा आकडा गाठेल.
3) रिंकू सिंu 1,000 धावा पूर्ण करण्यापासून 107 धावा दूर- आयपीएलमध्ये अनेक महान फलंदाज झाले आहेत. ज्यांनी खूप धावा केल्या आहेत. या यादीत भारतातील अनेक महान खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये युवा खेळाडूंची नावेही समाविष्ट आहेत. आता या लीगमध्ये 1,000 धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रिंकू सिंगचे नाव जोडले जाऊ शकते. तो आयपीएलमधील त्याच्या हजार धावांपासून फक्त 107 धावा दूर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चॅम्पियन्स ट्राॅफीत रोहित-विराट घालणार धुमाकूळ, प्रशिक्षकाची मोठी प्रतिक्रिया
शाब्बास..! स्मृती मानधनानं घडवला इतिहास, चौथ्यांदा जिंकला बीसीसीआयचा सर्वात मोठा पुरस्कार
निवृत्तीच्या 12 वर्षांनंतरही सचिनचा विशेष सन्मान, क्रिकेटच्या देवाला मिळाला हा पुरस्कार