इंडियन प्रीमियर लीग २०१२२ (आयपीएल २०२२) मधील सहावा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (KKRvRCB) यांच्या दरम्यान खेळला गेला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात अखेरीस आरसीबीने बाजी मारली. दिनेश कार्तिकने अखेरपर्यंत संयम दाखवत संघाला तीन गड्यांनी विजय मिळवून दिला. मात्र, या सामन्यात कोलकाताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) याने पुन्हा एकदा अप्रतिम कामगिरी केली. पावर प्लेमध्ये आरसीबीचे दोन बळी मिळवत त्याने एका नव्या यादीत प्रवेश केला.
उमेशची भेदक गोलंदाजी…
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरच्या फलंदाजांना अपयश आले. त्यांचा संपूर्ण संघ केवळ १२८ धावांमध्ये माघारी परतला. त्यानंतर केकेआरला सामन्यात पुनरागमन करून देण्याची जबाबदारी गोलंदाजांची होती. पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी करणाऱ्या उमेश यादवने पुन्हा एकदा संघासाठी तीच कामगिरी बजावली. त्याने पहिल्या षटकात सलामीवीर अनुज रावत याला खातेही न खोलू देता तंबूत पाठवले. त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने विराट कोहलीला बाहेरचा रस्ता दाखवला. त्याने या सामन्यात आपल्या चार षटकांमध्ये १६ धावा देताना दोन गडी बाद केले.
यासोबतच उमेशचा एका खास यादीत समावेश झाला. पावर प्लेमध्ये उमेशच्या नावे ४९ बळी जमा झाले आहेत. या यादीमध्ये पहिल्या स्थानी पंजाबचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मा आहे. त्याने आत्तापर्यंत पावर प्लेमध्ये ५३ बळी मिळवलेत. दुसरे स्थान संयुक्तरीत्या झहीर खान व भुवनेश्वर कुमार यांनी काबीज केले आहे. त्यांनी प्रत्येकी ५२ बळी मिळवले. तर आता उमेश या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
Never change, @y_umesh 💜#KKRHaiTaiyaar #RCBvKKR #IPL2022 pic.twitter.com/UzGvxB2MNS
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 30, 2022
शानदार राहिला उमेशचा कमबॅक…
मागील वर्षी उमेश दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. मात्र, त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. यावेळी कोलकाता नाईट रायडर्सने त्याला आपल्या संघात सामील केले. हंगामातील पहिल्याच सामन्यात त्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध दोन बळी मिळवत सामनावीर पुरस्कार पटकावला होता.
(KKR Umesh Yadav Takes Most wickets In Powerplay Overs In IPL)
अधिक वाचा –
आरसीबी जिंकली रे..! कोलकाताला लोळवून बेंगलोरने नोंदवला हंगामातील पहिला विजय, वाचा कसा रंगला सामना
उमेश-चक्रवर्तीने वाचवली केकेआरची लाज! दहाव्या विकेटसाठी भागीदारी करताना केला आयपीएल रेकॉर्ड
बीसीसीआय होणार मालामाल.! आयपीएल Media Rights मधून कमावणार ३३ कोटींहून अधिक | IPL