बुधवारी (२१ एप्रिल ) झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने १८ धावांनी विजय मिळवला. चेन्नई संघ पुन्हा आपल्या रंगात येताना दिसून येत आहे. संघातील फलंदाज आणि गोलंदाज संघासाठी साजेशी कामगिरी करताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स संघातील खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे सामना संपल्यानंतर कर्णधार ओएन मॉर्गनने संघातील खेळाडूंच्या कामगिरीवर संताप व्यक्त केला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाने दिलेल्या २२१ धावांचा पाठलाग करताना, कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या मुख्य फलंदाजांना धावा करण्यात अपयश आले होते. त्यांनतर पॅट कमिन्स, दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसलने तुफान फटकेबाजी केली ज्यामुळे सामना विजयाच्या जवळपास गेला होता. परंतु त्यांना विजय मिळवण्यात अपयश आले होते.
सामना झाल्यानंतर मॉर्गन म्हणाला, “सध्या माझ्या हृदयाचे ठोके खालीवर होत आहेत. खरचं क्रिकेट हा खेळ खूप खतरनाक आहे. पावरप्ले मध्ये आम्ही ज्या प्रकारचा खेळ केला, त्यानंतर आम्ही विचारही नव्हता केला की आम्ही दिलेल्या आव्हानाच्या जवळपास तरी पोहचू. दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसल यांच्यात झालेल्या भागीदारीमुळे आम्ही पुन्हा सामन्यात आलो. या परिस्थितीत तुम्ही स्वतः ला मोल्ड केले तर तुम्हाला थांबवणे फार कठीण होऊन जाईल. रसेल आणि कार्तिकच्या भागीदारीनंतर पॅट कमिन्सने ज्याप्रकारे फलंदाजी केली ते पाहून आम्हाला सामना जिंकण्याची खरोखर चांगली संधी होती.”
तसेच गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलताना मॉर्गन म्हणाला की, “जर फलंदाजांच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित कराल तर जाणवेल की त्यांनी जास्त चुका नाही नाही केल्या आहेत. हा, आम्हाला गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल थोडा विचार करावा लागेल. २२० धावा खर्च केल्यानंतर लगेचच ५ गडी बाद झाले होते. खरं सांगायचं झालं तर आपल्या गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल तुम्हाला प्रामाणिक असले पाहिजे. काही फरक पडत नाही, परंतु शेवटी तुम्हाला त्याचा त्रास सहन करावा लागेल.”
कोलकाता नाईट रायडर्स संघाला चांगली सुरुवात मिळाली नव्हती. याबाबत बोलताना मॉर्गन म्हणाला, “या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे की, आमच्या मध्य फळीतील आणि खालच्या फळीतील खेळाडूंनी कठोर संघर्ष केला. डावाची पहिली पाच षटके आमच्या पक्षात अजिबात नव्हती. जर आम्ही सुरुवातीपासूनच भागीदारी केली असती आणि मध्यल्या षटकांमध्ये ती सुरू ठेवली असती तर सामन्या आमचा दबदबा नक्कीच दिसला असता. आम्ही आणखी चांगल्या स्थितीत असतो.”
महत्वाच्या बातम्या:
व्हिडिओ : राजस्थान रॉयल्सच्या या गोलंदाजाने केली बुमराह, अश्विन आणि भज्जीच्या गोलंदाजीची नक्कल
अखेर प्रतिक्षा संपली! धोनीने मारला यंदाच्या हंगामातील पहिला षटकार, पाहा व्हिडिओ
यजमान झिम्बाब्वेची झुंज अपयशी, पहिल्या टी२० सामन्यात पाकिस्तानचा ११ धावांनी विजयी