---Advertisement---

कोलकाता विरुद्ध चेन्नईचा पराभव झाल्यानंतर धोनी, केदार झाले ट्रोल; सोशल मीडियावर मिम्स व्हायरल

On: गुरूवार, ऑक्टोबर 8, 2020 12:14 PM
---Advertisement---

आयपीएलमध्ये बुधवारी (7 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्सला 10 धावांनी पराभूत केले. केकेआरचा सलामीवीर राहुल त्रिपाठीने 81 धावांची शानदार खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर केकेआरने 167 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नई संघाला फक्त 157 धावाच करता आल्या.

या सामन्यात चांगल्या सुरुवातीनंतरही चेन्नईची मधली फळी गडगडली. चेन्नईकडून मधल्या फळीत फलंदाजीला आलेला कर्णधार एमएस धोनीला युवा फिरकीपटू वरून चक्रवर्ति याने 11 (12 चेंडू) धावावंर बाद केले. तर तो बाद झाल्यानंतर केदार जाधवने संथ फलंदाजी केली. त्याने 12 चेंडूत केवळ नाबाद 7 धावा केल्या. तसेच त्याने त्याच्या खेळीदरम्यान 8 चेंडू निर्धाव खेळले. ज्याचा फटका चेन्नई संघाला बसला आणि चेन्नईला केवळ 10 धावांनी या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

त्यामुळे या सामन्यानंतर सोशल मीडियावर धोनी आणि केदार मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत. तसेच यावेळी चाहत्यांनी अशीही आठवण करुन दिली आहे की धोनी सुनील नरेनच्या गोलंदाजीवर कधीही चौकार किंवा षटकार मारु शकलेला नाही.

https://twitter.com/IndianMourinho/status/1313897458280271872?s=20

https://twitter.com/JournalistWFH/status/1313899260081917952?s=20

चेन्नई सुपर किंग्सने आत्तापर्यंत यंदाच्या आयपीएल हंगामात 6 सामने खेळले असून त्यातील केवळ 2 सामने जिंकले आहेत आणि 4 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यांचा पुढील सामना शनिवारी(10 सप्टेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---