शनिवारी (२४ ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने ५९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. यादरम्यान प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाचा धडाकेबाज फलंदाज नितीश राणाने शानदार अर्धशतक ठोकले. हे अर्धशतक त्याने आपल्या सासऱ्यांना समर्पित केले. यादरम्यान तो भावुक झाला होता.
भावुक झालेल्या राणाने आपल्या सासऱ्यांच्या (सुरिंदर) नावाची जर्सी फडकावत त्यांना श्रद्धांजली वाहिली. नितीशच्या सासऱ्यांचे शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) कर्करोगामुळे निधन झाले होते.
Sent in to open the innings, @NitishRana_27 responds with a fine 5️⃣0️⃣ and dedicates it to his father in law, who passed away yesterday.#Dream11IPL pic.twitter.com/1LUINkpqpe
— IndianPremierLeague (@IPL) October 24, 2020
कोलकाताविरुद्ध नितीशने ५३ चेंडूत ८१ धावांचा पाऊस पाडला. या धावा करताना त्याने १ षटकार आणि १३ चौकार ठोकले. यासोबतच त्याने अष्टपैलू सुनील नरेनसोबत (६४) चौथ्या विकेटसाठी ११५ धावांची शतकी भागीदारी रचली.
प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने ६ विकेट्स गमावत १९४ धावा केल्या होत्या. या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघाने ९ विकेट्स गमावत केवळ १३५ धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. कोलकाताकडून गोलंदाजी करताना वरुण चक्रवर्तीने शानदार कामगिरी केली. त्याने ४ षटकात केवळ २० धावा देत सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
नितीश राणा आयपीएलच्या १३ व्या हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत ११ सामने खेळले असून २६५ धावा ठोकल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
-‘सुपर’ थरार!! कोलकाताच्या फर्ग्युसनने हैदराबादच्या जबड्यातून खेचला विजय
-हैदराबादला पराभवाची धूळ चारणाऱ्या कोलकाताला तब्बल ११ वर्षांनी सुपर ओव्हरमध्ये यश
-तूच रे पठ्ठ्या! कोलकाताच्या धुरंदराने केली धोनीच्या ७ वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी
ट्रेंडिंग लेख
-आयपीएलच्या १३ व्या हंगामात धोनीचा चेन्नई संघ झाला फ्लॉप, ही आहेत ३ प्रमुख कारणे
-‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’
-“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला