शनिवारचा (दि. 29 एप्रिल) दिवस गुजरात टायटन्स संघाच्या नावावर राहिला. आयपीएल 2023 स्पर्धेच्या 40व्या सामन्यात गुजरातचा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होता. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या या सामन्यात गुजरातने 7 विकेट्सने विजय मिळवला. तसेच, गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले. या सामन्यात गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने शानदार गोलंदाजी करत खास विक्रम आपल्या नावावर केला.
नाणेफेक जिंकत गुजरात टायटन्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी कोलकाताने निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 179 धावा केल्या. यावेळी मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने 4 षटकात 33 धावा खर्च करत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने 18व्या षटकात 3 विकेट्स गमावत आव्हान पार केले.
शमीचा विक्रम
कोलकाताच्या डावादरम्यान गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने एन जगदीशन, शार्दुल ठाकूर आणि आंद्रे रसेल यांना तंबूचा रस्ता दाखवला. शमीने या 4 षटकात एकूण 12 चेंडू असे टाकले, ज्यावर फलंदाजाला एकही धाव घेता आली नाही. यासोबतच शमी हा आयपीएल 2023मध्ये 100 निर्धाव चेंडू टाकणारा दुसरा गोलंदाज बनला.
A superb 𝐒𝐡𝐚𝐦𝐢-𝐬𝐡𝐨𝐰 at the Eden Gardens! 🌟🌟🌟@MdShami11 | #AavaDe #KKRvGT #TATAIPL 2023 pic.twitter.com/k5QvLMStfk
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 29, 2023
शमीपूर्वी हा कारनामा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने केला होता. आयपीएलच्या चालू हंगामात सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकण्याच्या बाबतीत कोलकाताचा गोलंदाज वरुण चक्रवर्ती तिसऱ्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत 75 चेंडू निर्धाव टाकले आहेत. अर्शदीप सिंगने 69 आणि भुवनेश्वर कुमार याने 67 चेंडू निर्धाव टाकले आहेत.
आठ सामन्यात घेतल्या 13 विकेट्स
मोहम्मद शमी याने आयपीएल 2023च्या 8 सामन्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये एकूण 101 सामने खेळणाऱ्या शमीच्या नावावर 112 विकेट्सची नोंद आहे.
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर कोलकातासाठी रहमानुल्लाह गुरबाज याने वादळी फलंदाजी केली. त्याने 39 चेंडूत 81 धावा केल्या. आंद्रे रसेल यानेही शेवटच्या षटकात 19 चेंडूत 3 षटकारांच्या मदतीने 34 धावा केल्या. या फलंदाजांच्या जोरावर कोलकाताने 179 धावा केल्या. हे आव्हान गुजरातने 17.5 षटकात 3 विकेट्स गमावत 180 धावा केल्या. विजय शंकर याने गुजरातकडून नाबाद 51 धावा चोपल्या. तसेच, शुबमन गिल याने 49 धावा केल्या. या विजयासोबतच गुजरात टायटन्सने 8 सामन्यात 6 विजयासह 12 गुण मिळवत गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले. (kkr vs gt fast Bowler mohammad shami completes 100 dot balls in ipl 2023 second bowler after mohammed siraj)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘सामन्यानंतर हॅरी ब्रूकला बदडताना काव्या मारन’, SRHचा महागडा खेळाडू फ्लॉप ठरताच ट्विटरवर मीम्सचा पाऊस
आयपीएलमध्ये जोशुआ लिटलचा विक्रम! सामनावीर बनताच खुलासा करत म्हणाला, ‘हार्दिक पंड्यामुळे…’