राॅयल्स चॅलेंजर्स बॅंगलोरने फाफ डु प्लेसीसच्या नेतृत्वाखाली बुधवारी (३० मार्च) कोलकाता नाईट रायडर्सला तीन विकेट्सने पराभूत करत गुणतालिकेत आपले खाते खोलले आहे. आरसीबीला पहिल्या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवण्यात अपयश आले होते, त्यामुळे आरसीबीचा हा पहिलाच विजय आहे. या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करत १२८ धावा केल्या. हे लक्ष्य आरसीबीने १९.२ षटकातच पुर्ण केले. शेवटच्या षटकात आरसीबीला विजयासाठी ७ धावा हव्या असताना दिनेश कार्तिकने पहिल्या चेंडूवर षटकार आणि दूसऱ्या चेंडूवर चौकार लगावला आणि संघाला विजय मिळवून दिला. यानंतर फाफ डु प्लेसीसने त्याची तुलना भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीसोबत केली आहे.
केकेआरविरुद्धचा सामना झाल्यानंतर डु प्लेसीस म्हणाला, “आम्ही या विजयामुळे खुप आनंदी आहोत. कमी धावसंख्येचे लक्ष्य गाठणे एवढी सोपी गोष्ट सुद्धा नाही. तुम्हाला नेहमी सकारात्मक राहण्याची गरज असते. तुम्ही सामना लवकर सोडूही शकत नाही. त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. या खेळपट्टीवर सीम आणि बाउंस सुद्धा होता. दोन-तीन दिवसांपूर्वी या मैदानात दोन्ही डावांत २०० धावा झाल्या आणि आज १२० विरुद्ध १२० झाल्या. शेवटी डीके (दिनेश कार्तिक) चा अनुभवही आमच्या कामी आला. तो शेवटच्या षटकांमध्ये धोनीसारखाच मस्त खेळतो.”
आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या ६ व्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसीसने ( Faf Du Plessis) नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना केकेआरने आरसीबीसमोर १२८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. केकेआरचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसलने १८ चेंडूत ३ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने २५ धावांची महत्त्वपुर्ण खेळी खेळली होती. बॅंगलोरच्या हसरंगाने ४ विकेट्स घेतल्या तर आकाश दीपने ३ विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार फाफ डू प्लेसीस ५ तर विराट कोहली १२ धावा करुन बाद झाले. डेविड विल्लीने १८ आणि रुदरफोर्डने २८ धावा केल्या. शेवटी शहबाज अहमदने २० चेंडूत ३ षटकारांच्या मदतीने २७ धावा केल्या तर दिनेश कार्तिकने ७ चेंडूत १४ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: अगग! पाकिस्तानी क्रिकेटरच्या मोठ्या चूकीनंतरही ऑस्ट्रेलियाचा अर्धशतकवीर दुर्देवीरित्या धावबाद
आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा झाली ‘ही’ कमाल, दोन्हीवेळी केकेआर आरसीबीच्या गोलंदाजांची शिकार