---Advertisement---

KKR VS RCB: हा होता सामन्याचा ‘टर्निंग पॉइंट’! केकेआरचा दारुण पराभव

---Advertisement---

आयपीएल 2025च्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या केकेआर संघाला दारुण पराभवाला समोरे जावे लागले. केकेआरच्या डावाची सुरुवात शानदार झाली असताना देखील संघ मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचला नाही. पहिल्या 10 षटकात 1 विकेट गमावून 100+ धावा करत केकेआर संघ 200+ धावांच्या लक्ष्याकडे आग्रेसर होता. पण 10 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रायणच्या रुपाने संघाला पहिला धक्का बसला.

नारायणन 44 धावा काढून झेलबाद झाला, त्याला रसिक दर सलामने बाद केले, यानंतर केकेआरची गाडी पटरीवरुन घसरली, 11व्या षटकात कर्णधार अजिंक्य रहाणेच्या रुपाने संघाला तिसरा धक्का बसला, रहाणे 56 धावा करुन बाद झाला. यानंतर संघाच्या धावसंख्येला ब्रेक लागला, सामन्याच्या या निर्णायक टप्यावर आरसीबीने कमबॅक केला व कसुन गोलंदाजी केली परिणामी सामना आरसीबीच्या पारड्यात झुकला. दुसरीकडे आरसीबीच्या धारदार गोलंदाजीसमोर केकेआरने एका पाठोपाठ विकेट गमावल्या, शेवटी रघुवंशीने 30 धावा करत संघाला सन्मानजनक (175 धावा) धावसंख्येपर्यंत पोहचवले. केकेआरची मधली फळी (व्यंकटेश अय्यर 06, रिंकू सिंग 12, आंद्रे रसल 04 धावा) सपेशल फ्लाॅप ठरली. संघाला शेवटच्या 10 षटकात केवळ 65 धावा करता आल्या, ज्यामुळे संघ 20 षटकात 174 धावांपर्यंत पोहोचला. आरसीबीकडून गोलंदाजीत कृणाल पांड्याने तीन तर जोश हेझलवूडने 2 विकेट्स घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने केवळ 16.2 षटकात सामना आपल्या नावे केला. ज्यात विराट कोहली आणि फिलिप साॅल्ट यांनी तुफानी अर्धशतकी खेळी खेळली. विराटने नाबाद 59 धावा केल्या तर फिलिप साॅल्टने 56 धावा करुन बाद झाला, या दोघांशिवाय रजत पाटीदारने 34 धावा तर लियाम लिव्हिंगस्टोनने 15 धावा केल्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---