अबुधाबी। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ३१ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सोमवारी (२० सप्टेंबर) खेळला गेला. या सामन्यात केकेआर समोर विजयासाठी ९३ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. या आव्हानाचा पाठलाग केकेआरने १० षटकात केवळ १ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केला आणि सामना ९ विकेट्सने जिंकला.
कोलकाताकडून शुबमन गिलसह वेंकटेश अय्यर सलामीला उतरला होता. या दोघांनी कोलकाताला दमदार सुरुवात करुन दिली. काही आक्रमक फटके खेळताना दोघांनीही अर्धशतकी भागीदारी रचली. हे दोघेच कोलकाताला विजयाच्या पार नेणार असे वाटत असतानाच गिल ४८ धावांवर खेळत असताना युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर मोहम्मद सिराजकडे झेल देत बाद झाला. त्यामुळे त्याची आणि वेंकटेशची ८२ धावांची भागीदारी तुटली.
मात्र अखेर वेंकटेश अय्यर आणि आंद्रे रसलने नंतर विकेट जाऊ न देता कोलकाताला ९४ धावांपर्यंत पोहचवत विजय मिळवून दिला. वेंकटेश अय्यर २७ चेंडूत ४१ धावांवर नाबाद राहिला. तर, रसल शून्यावर नाबाद राहिला.
बेंगलोरची फलंदाज अपयशी
या सामन्यात बेंगलोरचा संघाचा डाव १९ षटकात ९२ धावांवर संपुष्टात आला. बेंगलोरकडून देवदत्त पडीक्कलने सर्वाधिक २२ धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा आकडाही पार करता आला नाही. कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसल यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. लॉकी फर्ग्यूसनने २ विकेट्स घेतल्या आणि प्रसिद्ध कृष्णाने १ विकेट घेतली.
कोलकाताची भेदक गोलंदाजी
या सामन्यात बेंगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय त्यांच्या अंगलट येत आहे. बेंगलोरने दुसऱ्या षटकात कर्णधार विराट कोहलीची विकेट गमावली होती. देवदत्त पडीक्कलसह सलामीला फलंदाजीला आलेला विराट केवळ ५ धावा करुन प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने डीआरएसचा वापर केला, पण यात तो बाद झाल्याचे स्पष्ट दिसले.
त्यानंतर पदार्पणवीर केएस भरतने देवदत्तची साथ देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचीही जोडी फार काळ टिकली नाही. देवदत्त ६ व्या षटकात २२ धावांवर लॉकी फर्ग्यूसन विरुद्ध खेळताना बाद झाला. त्यानंतर केएस भरतला ९ व्या षटकात आंद्रे रसलने १६ धावांवर शुबमन गिल करवी झेलबाद केले. याच षटकात अनुभवी डिव्हिलियर्स पहिलाच चेंडू खेळताना शून्यावर त्रिफळाचीत झाला.
Another BIG Wicket as @Russell12A strikes again and removes AB de Villiers for a duck.
Live – https://t.co/iUcKgUAEzT #KKRvRCB #VIVOIPL pic.twitter.com/H7jkWwnOhu
— IndianPremierLeague (@IPL) September 20, 2021
त्यामुळे बेंगलोरची अवस्था १० षटकांनंतर ४ बाद ५४ धावा अशी झाली. त्यानंतरही बेंगलोरकडून कोणाला मोठी खेळी करता आली नाही. १२ व्या षटकात ग्लेन मॅक्सवेल आणि या सामन्यातून पदार्पण केलेल्या वनिंदू हसरंगाला वरुण चक्रवर्तीने माघारी धाडत बेंगलोरला दुहेरी धक्का दिला. मॅक्सवेल १० धावांवर आणि हसरंगा शून्यावर बाद झाला.
Maxwell is clean bowled for 10 runs by Varun Chakravarthy.#RCB 63/5 https://t.co/1A9oYR0vsK #KKRvRCB #VIVOIPL pic.twitter.com/LgQS9Usiz2
— IndianPremierLeague (@IPL) September 20, 2021
त्यापाठोपाठ १४ व्या षटकात सचिन बेबीला ७ धावांवर चक्रवर्तीनेच बाद केले. काईल जेमिसन १६ व्या षटकात ४ धावांवर धावबाद झाला. तर, १६ व्या षटकात हर्षल पटेलला फर्ग्यूसनने १२ धावांवर बाद केले. अखेर १९ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मोहम्मद सिराज ८ धावांवर रसेलविरुद्ध खेळताना बाद झाला. याबरोबरच बेंगलोरचा डाव ९२ धावांवर संपुष्टात आला.
तीन खेळाडूंचे पदार्पण
हा सामना बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीचा आयपीएलमधील २०० वा सामना आहे. या सामन्यातून बेंगलोरकडून युवा फिरकीपटू वनिंदू हसरंगा आणि यष्टीरक्षक फलंदाज केएल भरत आयपीएल पदार्पण करत आहेत.
तर, कोलकाताकडून वेंकटेश अय्यर आयपीएल पदार्पण करत आहे. आजचा सामना कोलकातासाठी २०० वा आयपीएल सामना आहे.
#RCB have won the toss and they will bat first against #KKR.
Live – https://t.co/1A9oYR0vsK #KKRvRCB #VIVOIPL pic.twitter.com/753svRUTry
— IndianPremierLeague (@IPL) September 20, 2021
असे आहेत ११ जणांचे संघ –
कोलकाता नाईट रायडर्स : शुबमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, ओएन मॉर्गन (कर्णधार), आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती, प्रसिध्द कृष्णा
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, केएस भारत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स (यष्टीरक्षक), वनिंदू हसरंगा, सचिन बेबी, काईल जेमीसन, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल