काल (१८ एप्रिल ) झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने ३८ धावांनी विजय मिळवत विजयाची हॅट्रिक केली आहे. या सामन्यातील पहिल्या डावात एबी डिविलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेलने तुफान फटकेबाजी केली होती. अशातच पहिल्या डावातील शेवटच्या षटकात कोलकाताचा अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसलने असे काही केले होते. ज्या कृत्यामुळे सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ फलंदाजी करत असताना शेवटचे षटक टाकण्यासाठी आंद्रे रसल आला होता. या षटकात एबी डिविलियर्स आणि काईल जेमिसन यांची जोडी मैदानावर होती. या षटकात डिविलियर्सने २१ धावा ठोकल्या पण रसलने टाकलेल्या पाचव्या चेंडूवर डिविलियर्सने शॉट खेळला आणि तो चेंडू सरळ रसलच्या हातात गेला होता. रसलला नॉन स्ट्राइकवर असलेल्या काईल जेमिसनला धावबाद करण्याची संधी होती. परंतु, त्याने असे केले नाही. या नंतर सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत की, रसलने त्याला धावबाद का केले नाही.
दरम्यान, अनेक चाहत्यांनी यामागे अंदाज लावला आहे की ज्यावेळी रसलला जेमिसनला बाद करण्याची संधी मिळाली होती, तो शेवटच्या षटकातील ५ वा चेंडू होता. त्यावर जरी जेमिसनला बाद केले असते तरी स्ट्राईकवर एबी डिविलियर्स राहिला असता. त्यामुळे जेमिसनला बाद करण्यात काहीच अर्थ नव्हता.
https://twitter.com/lodulalit001/status/1383761444739588100
He bowl 5th ball of 20th over and runout would not going to matter as of its AB who was going to face last ball of the inning…so there is nothing to discuss
— swapnil varose (@swapnilvarose) April 19, 2021
Anyways one ball left.. then what's the point of running him out.. merely time waste..
— hari kishore (@harikishore09) April 19, 2021
https://twitter.com/Chandan72116628/status/1384015692173746176
It doesn't matter to run-out in 5th ball of last over. Anyhow ABD will face the last ball or neither he will save any run 🤷🏻♂️.
— Sanjan ✳️ (@sanjanind) April 19, 2021
It's an act of sportsmenship as it is of no use of running out Jamieson as the next ball was the last ball of the innings.
— Rohit Nagda (@Shiba5529) April 19, 2021
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने उभारला २०४ धावांचा डोंगर
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकाअखेर २०४ धावा केल्या होत्या. यामध्ये ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिविलियर्सने महत्वाची भूमिका बजावली होती. विराट कोहली या सामन्यात ५ धावा करत माघारी परतला होता. तर पडीक्कलने २५ धावांची खेळी केली होती. तसेच या सामन्यात पदार्पण करणाऱ्या रजत पाटीदारने अवघी १ धावा केली.
त्यामुळे एका क्षणी बेंगलोर संघ अडचणीत सापडला असाताना एबी डिविलियर्स आणि मॅक्सवेलने ताबडतोड खेळी केली होती. ग्लेन मॅक्सवेलने ४९ चेंडूत ७८ धावांची खेळी केली होती. यात त्याने ९ चौकार आणि ३ षटकार लगावले होते. तसेच एबी डिविलियर्सने देखील ७६ धावांची खेळी केली होती. यात त्याने ९ चौकार आणि ३ षटकार लगावले होते.
कोलकाता नाईट रायडर्स संघाचे फलंदाज ठरले अपयशी
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने दिलेल्या २०५ धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाला चांगली सुरुवात मिळाली. परंतु, त्यांच्या फलंदाजांना मोठ्या धावा करण्यात अपयश आले होते. गिलने २१ धावा केल्या तर नितीश राणाने १८ धावांची खेळी केली. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून आंद्रे रसलने सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली.इतर फलंदाजांना धावा करण्यात अपयश आले होते. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने ३८ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या –
समालोचन करताना सुनील गावसकरांनी केली मोठी चूक; बेन स्टोक्सने नाव न घेता ‘असे’ केले ट्रोल
हैद्राबादच्या अपयशाचे लक्ष्मणने सांगितले कारण, ‘यांना’ धरले जबाबदार
पदार्पणाच्या सामन्यात हॅट्रिकसह ९ बळी घेत ‘या’ गोलंदाजाने घडविला इतिहास